पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबार आझमने सर्वोत्तम फलंदाज म्हणून आपली दावेदारी आणखी मजबूत केलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कराची येथील सामन्यामध्ये आझमने १९६ धावांची खेळी केल्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुहेरी शतकापासून चार धावा दूर असतानाच बाबर बाद झाला. मात्र त्याच्या खेळीमुळे पाकिस्तानला एकवेळी दारुण पराभव होईल असं वाटत असणारा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आलं.

बाबरने केलेल्या या कामगिरीमुळे तो सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असल्याचं त्याच्या चाहत्यांनी म्हटलंय. चाहत्यांसोबतच क्रिकेटमधील अनेक जाणकारांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सध्याच्या क्षणी बाबरच सर्वोत्तम असल्याचं मत व्यक्त केलंय. मात्र असं असलं तरी अनेकजण रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू असल्याचं मानतात. सोशल मीडियावर ही चर्चा सुरु असतानाच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने यासंदर्भातील मत व्यक्त केलंय. वॉनने ट्विटरवरुन बाबरचं तोंडभरुन कौतुक केलंय. पाकिस्तानचा हा फलंदाज सध्याच्या घडीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असल्याची शब्बासकीची थाप वॉनने दिलीय.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

“माझ्यामते बाबर आझम हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, याबद्दल काही प्रश्नच उद्भवत नाही. तो सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये भन्नाट कामगिरी करतोय,” असं वॉन ट्विटमध्ये म्हणालाय.

वॉनच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवण्यात येत असल्या तरी अनेकांनी कराचीमधील खेळपट्टी ही फलंदाजीसाठी उत्तम असल्याचा मुद्दा उपस्थित केलाय. ही खेळपट्टी एखाद्या रस्त्याप्रमाणे असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. त्यामुळे येथे धावा करणं आझमला सहज शक्य झाल्याचं काहींनी म्हटलंय. पाकिस्तानी चाहत्यांनी वॉनच्या मतासोबत सहमत असल्याचं म्हटलंय.