शाह आलम (मलेशिया) : भारतीय महिला संघाने आशिया सांघिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदकाच्या आशा कायम राखण्याची ‘अनमोल’ कामगिरी केली. भारतीय संघाने शनिवारी उपांत्य फेरीत दोन वेळच्या विजेत्या जपानला ३-२ असा पराभवाचा धक्का दिला आणि अंतिम फेरीत धडक मारली. भारताच्या या विजयात नवोदित अनमोल खरबची कामगिरी पुन्हा निर्णायक ठरली. आता जेतेपदासाठी भारताची गाठ थायलंडशी पडणार आहे.

जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानावर असलेली ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद जोडी, एकेरीत जागतिक क्रमवारीत ५३व्या स्थानावर असणारी अश्मिता चलिहा आणि १७ वर्षीय अनमोल या उदयोन्मुख खेळाडूंच्या नेत्रदीपक कामगिरीने भारताला हा विजयाचा क्षण अनुभवता आला. एखाद्या भारतीय संघाने प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी २०१६ आणि २०२० मध्ये भारताच्या पुरुष संघाने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

अकाने यामागुची, युकी फुकुशिमा-सायाका हिरोता, मायु मात्सुमोटो-वकाना नागाहारा या प्रमुख खेळाडूंविना जपान संघ खेळत असला, तरी तो भारताच्या तुलनेत बलाढय़ होता. त्यांना हरवणे आव्हानात्मक होते. मात्र, ते अशक्य नव्हते हे भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले.

हेही वाचा >>> Ranji Trophy 2024 : चेतेश्वर पुजाराने ‘बॅझबॉल’ शैलीत झळकावले दमदार शतक, टीम इंडियात परतण्याचे दिले संकेत

प्रदीर्घ विश्रांतीनंतर या स्पर्धेतून पुनरागमन करणाऱ्या सिंधूने यापूर्वीच्या दोन लढती जिंकल्या होत्या. मात्र, जपानविरुद्धच्या लढतीत ती डावखुऱ्या आया ओहोरीसमोर फारसे आव्हान उपस्थित करू शकली नाही. पहिल्या एकेरीच्या सामन्यात सिंधूला ओहोरीकडून १३-२१, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारताने या वेळी दुहेरीच्या पहिल्या लढतीत ट्रिसा-गायत्री जोडीला उतरवले. त्यांनी हा विश्वास सार्थ ठरवताना नामी मास्तुयामा-चिहारु शिडा जोडीचा ७३ मिनिटांत २१-१७, १६-२१, २२-२० असा पराभव केला. अश्मिताने आपले कौशल्य पणाला लावताना माजी जगज्जेत्या नोझोमी ओकुहाराचे आव्हान २१-१७, २१-१४ असे परतवले. या सामन्यात अश्मिताने दाखवलेली आक्रमकता कमालीची होती. ‘ओव्हरहेड क्रॉस ड्रॉप्स’ आणि ‘स्मॅशेस’नी अश्मिताने ओकुहाराला जेरीस आणले. 

अश्विनी पोनप्पा-तनिशा क्रॅस्टो जोडीला मात्र दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत अपयश आले. रेना मियाउरा-आयाको साकुरामोटो जोडीने ४३ मिनिटांत भारतीय जोडीचा २१-१४, २१-११ असा पराभव केला. त्यामुळे एकूण लढतीत जपानने पुन्हा २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे निर्णायक सामन्यात १७ वर्षीय अनमोलवरील जबाबदारी वाढली होती. मात्र, दडपणाचा कुठलाही परिणाम अनमोलच्या खेळावर झाला नाही. तिने जागतिक क्रमवारीत २९व्या स्थानावर असलेल्या नात्सुकी निदायराचे आव्हान २१-१४, २१-१८ असे सहज परतवत भारताला विजय मिळवून दिला.