कर्णधार सुब्रमण्यम बद्रीनाथ याने केलेल्या शानदार शतकामुळेच विदर्भ संघास रणजी क्रिकेट सामन्यात राजस्थानविरुद्ध विजयासाठी ४०५ धावांचे आव्हान ठेवता आले. त्याच्या नाबाद १५२ धावांच्या जोरावर विदर्भने दुसरा डाव ४ बाद २९६ धावांवर घोषित केला.
विदर्भ संघाची एक वेळ २ बाद १९ अशी दयनीय स्थिती होती. मात्र बद्रीनाथ याने सलभ श्रीवास्तव याच्या साथीत चौथ्या विकेटसाठी १९१ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. श्रीवास्तव याने शैलीदार खेळ करीत ७५ धावा केल्या. बद्रीनाथ याने २०३ चेंडूंमध्ये नाबाद १५२ धावा करताना १९ वेळा चेंडू सीमापार केला.
राजस्थान संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी दिवसअखेर १ बाद ३३ धावा केल्या. खेळ संपला त्या वेळी विनीत सक्सेना (नाबाद १०) व रॉबिन बिश्त (नाबाद १२) हे खेळत होते.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2014 रोजी प्रकाशित
बद्रीनाथच्या शतकासह विदर्भची बाजू भक्कम
कर्णधार सुब्रमण्यम बद्रीनाथ याने केलेल्या शानदार शतकामुळेच विदर्भ संघास रणजी क्रिकेट सामन्यात राजस्थानविरुद्ध विजयासाठी ४०५ धावांचे आव्हान ठेवता आले.
First published on: 31-12-2014 at 12:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badrinath smashes century to put vidarbha in control