भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळला जात आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ४०४ धावा केल्या. संघाने २९३ धावांवर ७ गडी गमावल्या होत्या. मात्र यानंतर कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी खेळपट्टीवर पाय रोवून भारताला चारशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्या दोघांमध्ये ८७ धावांची भागीदारी झाली होती. ही भागीदारी ८२ धावांची झाली असती पण बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकाकडून एक खूप मोठी अनवधानाने चूक झाली आणि त्याचा फायदा भारताला अतिरिक्त ५ धावांच्या स्वरुपात मिळाला.

भारताला पेनल्टीमधून ५ धावा मिळाल्या

भारतीय संघाला ११२व्या षटकात ५ पेनल्टी धावा मिळाल्या. चेंडू अश्विनच्या बॅटच्या बाहेरील कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने गेला. दरम्यान, अश्विन आणि कुलदीपने पळत सुटत २ धावा पूर्ण केल्या. तिथून खेळाडूने चेंडू उचलून फेकला, पण यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचण्यापूर्वीच तो मागे ठेवलेल्या हेल्मेटला लागला. चेंडू विकेटच्या मागे ठेवलेल्या हेल्मेटला लागल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावांची पेनल्टी मिळते.

नियम काय म्हणतो

नियमानुसार, मैदानावर ठेवलेल्या हेल्मेटवर चेंडू यष्टिरक्षकाला किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कोणत्याही खेळाडूला लागला, तर त्या चेंडूवर फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा दंड म्हणून दिल्या जातात. इथेही तेच झालं.

पहिल्या दिवशी भारतीय संघाने २७३ पर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशीचा नाबाद फलंदाज श्रेयस केवळ चार धावांची भर घालून वैयक्तिक ८६ धावांवर माघारी परतला. रविचंद्रन अश्विन याने ५८ तर कुलदीप यादवने ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाला ४०४ अशी मजल मारून दिली. बांगलादेश साठी तैजुल इस्लाम व मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले.

हेही वाचा:   BAN v IND 2022: शुबमन गिलने नुरुल हसनचा उत्कृष्ट झेल घेतला; विराट कोहलीने उत्साहात त्याच्या सोबत असे काही केले की… पाहा video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मद सिराजने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर नझमुल हुसेन शांतोला यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद करून असा धक्का दिला की यजमानांना सावरता आले नाही आणि ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. सिराजने झाकीर हसन आणि लिटन कुमार दासला बाद केले तर उमेश यादवने यासिर अलीला त्रिफळाचीत केले. खेळपट्टीचा फायदा घेत कुलदीपने मुशफिकुर, शाकिब, नुरुल हसन आणि तैजुल इस्लामचे विकेट्स काढले. १०२ धावांत आठ गडी बाद झाल्याने, इबादत आणि मेहदी हसन यांनी दिवसाचा उर्वरित खेळ सुरक्षित केला, परंतु उद्याचा सामना लांबवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.