अल अमिरात : स्कॉटलंडकडून सलामीच्या लढतीत पत्करलेल्या बांगलादेशने गुरुवारी पापुआ न्यू गिनी संघावर ८४ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची ‘अव्वल १२’ फेरी गाठली. अष्टपैलू कामगिरी करणारा शाकिब अल हसन बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ७ बाद १८१ धावांचे आव्हान उभे केले. कर्णधार महमुदुल्ला (२८ चेंडूंत ५० धावा) आणि शाकिब अल हसन (३७ चेंडूंत ४६ धावा) यांनी बांगलादेशच्या धावसंख्येत महत्त्वाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात, पापुआ संघाचा डाव १९.३ षटकांत ९७ धावांत कोसळला. शाकिबने ४ षटकांत ९ धावांत पापुआ संघाचे चार फलंदाज बाद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh qualifies for top 12 round akp
First published on: 22-10-2021 at 00:13 IST