क्रिकेटच्या खेळात कधी, काय होईल, हे सांगता येत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतो, हे आपण कित्येक वेळा पाहिले आहे. याचेच एक उदाहरण समोर आले आहे. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज असताना प्रतिस्पर्धी संघाने एकही चौकार-षटकार न मारता विजय मिळवला. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण ते एका सामन्यात घडले आहे.

पाकिस्तानच्या कराची शहरात सुरू असलेल्या अल-वकील क्रिकेट लीगच्या एका सामन्यात हा प्रकार घडला आहे. या सामन्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल-वकील क्रिकेट लीगमध्ये ऑटोमल आणि ऑडिओनिक संघ यांच्यात सामना झाला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. या सामन्यात ऑटोमल संघाला २० षटकात १५५ धावा करायच्या होत्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर संघाला विजयासाठी ५ धावांची गरज होती आणि त्यांच्या दोन विकेट शिल्लक होत्या.

अशा परिस्थितीत चौकार-षटकारांशिवाय जिंकणे अशक्य आहे, असे सर्वांनाच वाटत होते. पण जे घडले, ते अद्भुतच होते. विजयासाठी आवश्यक असलेल्या ५ धावा फलंदाजांनी धावून पूर्ण केल्या. शेवटच्या चेंडूवर फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. फलंदाजाने टोलवलेला चेंडू लाँग ऑफला तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो. हा चेंडू पकडल्यानंतर, तो विकेटवर फेकण्याऐवजी, क्षेत्ररक्षक स्वतः फलंदाजाला धावबाद करण्यासाठी नॉन-स्ट्रायकरच्या टोकाकडे धावतो, पण तोपर्यंत फलंदाज क्रीजच्या आत पोहोचतो आणि ३ धावा पूर्ण होतात.

हेही वाचा – BCCI मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत..! भारत ‘या’ संघाविरुद्ध खेळणार ‘पिंक बॉल’ टेस्ट?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर तोच क्षेत्ररक्षक दुसऱ्या टोकाकडे धावतो आणि फलंदाजाला धावबाद करण्यासाठी चेंडू फेकतो. यावेळी, चेंडू विकेटवर न आदळत थर्ड मॅनकडे जातो. दरम्यान, विजयासाठी आवश्यक असलेल्या ५ धावा पूर्ण करण्यासाठी दोन्ही फलंदाज आणखी दोन धावा घेतात आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतात.