बिग बॅश लीग २०२३ मधील सामना सिडनी सिक्सर्स विरुद्ध ब्रिस्बेन हीट यांच्यात गुरुवारी झाला. या सामन्यादरम्यान थर्ड अंपायरच्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा विचित्र निर्णय सिडनी सिक्सर्सच्या फलंदाजीदरम्यान दिसला. जेव्हा ब्रिस्बेन हीटने जोश फिलिपच्या विकेटसाठी अपील केली.

डीआरएसच्या मागणीनंतर अंपायरने प्रथम फिलिपला नाबाद घोषित केले, परंतु खेळाडूंनी पुन्हा अपील केल्यावर तिसऱ्या पंचाने स्वत:चाच निर्णय बदलून त्याला बाद घोषित केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वास्तविक, पॉवरप्लेनंतर पहिल्याच चेंडूवर फिलिपला मॅथ्यू कुहनमनचा चेंडू स्वीप करायचा होता, पण त्यात तो यशस्वी झाला नाही. ब्रिस्बेन हीटच्या खेळाडूंनी अंपायरकडे एलबीडब्ल्यू आऊटचे अपील केली, पण अंपायरने त्यांची अपील फेटाळून लावली. त्यानंतर ब्रिस्बेन संघाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचाला रिप्लेमध्ये आढळले की चेंडू त्याच्या पॅडला नाही तर ग्लव्सला लागला. अशा स्थितीत तिसर्‍या पंचाने निर्णय देताना फिलिपला नाबाद घोषित केले.

यानंतर खरी कहाणी सुरू झाली. वास्तविक, रिव्ह्यू घेतल्यानंतर तिसर्‍या अंपायरला सर्व काही तपासावे लागते. जेणेकरून खेळाडू आऊट झाला की नाही हे कळू शकेल. तिसर्‍या पंचाने येथे एलबीडब्ल्यू तपासला, पण यष्टिरक्षकाने तो झेल पकडला होता की नाही हे तपासायला तो विसरला. जेव्हा खेळाडूंनी पुन्हा अपील केली तेव्हा तिसऱ्या पंचांना रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू ग्लव्सना स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या ग्लव्समध्ये गेला. त्यामुळे त्याला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि फिलिप्सला बाद घोषित करावे लागले.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: कसोटी मालिकेसाठी विराट कोहली आणि केएल राहुल स्टायलिश शैलीत नागपुरात दाखल, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ब्रिस्बेन हीटने हा सामना ४ विकेटने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिडनी सिक्सर्स संघाला निर्धारित २० षटकात ९ गडी गमावून केवळ ११६ धावा करता आल्या. ब्रिस्बेनने १० चेंडू शिल्लक असताना ही धावसंख्या गाठली. मायकेल नेसरच्या ४८ धावांच्या नाबाद खेळीने संघाला विजयापर्यंत नेले.