BCCIचे जय शाह निघाले ‘छुपे रुस्तम’..! क्रिकेटच्या सामन्यात गांगुलीच्या संघाचे ३ फलंदाज बाद केलेच सोबतच…

भारताचा लाडका कॅप्टन फलंदाजीला मैदानात उतरला, तेव्हा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. पाहा VIDEO

bcci agm festival match 2021 sourav ganguly team loses against jay shah team
सौरव गांगुली विरुद्ध जय शाह

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दोन संघांमध्ये एक रंजक सामना खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या अनुक्रमे बीसीसीआय अध्यक्ष इलेव्हन आणि बीसीसीआय सचिव इलेव्हन असे दोन संघ आमनेसामने आले. यात जय शाह यांच्या संघाने गांगुलीच्या संघाचा एका धावेने पराभव केला.

प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात उतरलेल्या गांगुलीने दमदार फलंदाजी करताना ३५ धावांची शानदार खेळी केली. मात्र, या रोमांचक सामन्यात जय शहाच्या संघाला एका धावेने विजय मिळवण्यात यश आले. प्रथम फलंदाजी करताना जय शहा यांच्या संघाने ३ गडी गमावून १२८ धावा केल्या. संघासाठी जयदेव शाह यांनी ४० धावा केल्या. तर अरुण धुमाळ यांनी ३६ धावांची खेळी केली. त्याचवेळी बीसीसीआयचे सचिव १० धावांवर नाबाद राहिले. सौरव गांगुलीने १९ धावांत एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs NZ : विराट बाद की नाबाद? पंचांच्या वादग्रस्त निर्णयावरून सोशल मीडियावर उठलं वादळ; इंग्लंडचा वॉन म्हणतो…

प्रत्युत्तरात गांगुलीच्या संघाला सामना जिंकण्यासाठी १२९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या गांगुलीने जोरदार फलंदाजी केली. यादरम्यान त्याच्या ऑफ साइडमध्ये अनेक ट्रेड मार्क स्ट्रोक दिसले. या सामन्यात गांगुलीने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. नियमानुसार त्याला निवृत्ती घ्यावी लागली. गांगुलीशिवाय अभिषेक दालमियाने १३ आणि मोहम्मद अझरुद्दीनने २ धावा केल्या.

अशाप्रकारे, गांगुलीच्या संघाला निर्धारित १५ षटकात केवळ १२७ धावा करता आल्या आणि संघाचा सामना एका धावेने गमवावा लागला. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी शानदार गोलंदाजी करताना ५८ धावांत तीन बळी घेतले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bcci agm festival match 2021 sourav ganguly team loses against jay shah team adn

ताज्या बातम्या