Domestic Cricket Season 2023-2024 Schedule : आयपीएल २०२३ चा धुमाकूळ सुरु असतानाच आता राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांची रणधुमाळी लवकरच सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने रणजी ट्रॉफी आणि मुश्ताक अली ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या जून महिन्यात दुलिप ट्रॉफी सुरु होणार असून पुढील वर्षी जानेवारी-मार्च महिन्यादरम्यान रणजी ट्रॉफीचं बिगुल वाजणार आहे. २०२३-२४ च्या क्रिकेट स्पर्धांचं शेड्यूल बीसीसीआयने आज मंगळवारी जाहीर केलं आहे. जून २०२३ आणि मार्च २०२४ च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत एकूण १८४६ सामने खेळवले जाणार आहेत.

दुलिप ट्रॉफीपासून या क्रिकेट स्पर्धांची सुरुवात होणार आहे. २८ जून २०२३ ते १६ जुलै २०२३ पर्यंत ही टुर्नामेंट होणार आहे. यामध्ये देवधर ट्रॉफीचाही समावेश असणार आहे. २४ जुलै २०२३ पासून ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत ही टूर्नामेंट खेळवली जाणार आहे. सहा झोनमध्ये क्रिकेटची स्पर्धा रंगणार आहे. मध्य, दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम आणि उत्तर-पूर्व भागात ही स्पर्धा होणार आहे. १ ऑक्टोबर २०२३ पासून द इरानी कप सौराष्ट्र स्पर्धा सुरु होणार आहे.

नक्की वाचा – सामन्यात झाली RCB ची परिस्थिती ‘गंभीर’ पण गौतमने बंगळुरुच्या चाहत्यांना दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन, Video होतोय व्हायरल

तीन मल्टी डे टूर्नामेंटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्ऱ़ॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीचा समावेश असणार आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून ही स्पर्धा सुरु होणार असून ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत या स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. त्यानंतरचे सामने २३ नोव्हेंबर २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरु होणार आहेत. या व्हाईट बॉल टूर्नामेंटमध्ये ३८ संघांचा समावेश असणार आहे. ७ संघाचे दोन ग्रुप केले जाणार तीन ग्रुपमध्ये प्रत्येकी ८ संघ असणार आहेत.

तसंच भारतातील अतिशय महत्वाची रणजी ट्रॉफी स्पर्धा ५ जानेवारी २०२४ ते १४ मार्च २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. या स्पर्धेत ३८ संघ पाच ग्रुपमध्ये विभागले जाणार आहेत. तर चार विशेष ग्रुपमध्ये प्रत्येकी ८ संघ असणार आहेत. तर प्लेट ग्रुपमध्ये सहा संघांचा समावेश असणार आहे. विशेष ग्रुपमध्ये असणारे संघ प्रत्येकी सात लिग स्टेज मॅचेस खेळतील. आणि प्रत्येक ग्रुपमधील दोन संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतील. प्लेट ग्रुपमध्ये असणारे सहा संघ प्रत्येकी पाच लीग स्टेज मॅचेस खेळतील. यामधील चार टॉपचे संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसंच वुमन्स डोमेस्टिक सीजन क्रिकेटमध्ये सीनियर वुमन्स टी-२० ट्रॉफीची स्पर्धा असणार आहे. १९ ऑक्टोबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे. तसंच सीनियर वुमन्स इंटर झोनल ट्रॉफी २४ नोव्हेंबर २०२३ ते ४ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर २०२४ मध्ये सीनियर वुमन्स वन डे ट्रॉफीला प्रारंभ होईल. ४ जानेवारी २०२४ ला ही स्पर्धा सुरु होईल आणि २६ जानेवारी २०२४ ला या स्पर्धेचा अंतिम सामना होईल.