scorecardresearch

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना झाला होता.

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विश्वविक्रम; 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

इंडियन प्रिमीअर लीग ( आयपीएल ) २०२२ मधील अखेरचा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्याने आता मोठा विश्वविक्रम केला आहे. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या संख्येची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. बीसीसीआय आणि सचिव जय शाह यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

बीसीसीआयने सांगितलं की, “आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भारताने आपलं नाव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवलं गेलं आहे. चाहत्यांच्या समर्थनामुळे हे शक्य झालं,” असे बीसीसीआयने म्हटलं.

जय शाह म्हणाले की, “२९ मे २०२२ साली नरेंद्र मोदी स्टेडियमवर १०१,५६६ प्रेक्षकांनी अंतिम सामना पाहिला. ट्वेन्टी-२० सामन्यात सर्वाधिक उपस्थितीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला, अभिमान वाटला. सर्व चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन,” असे जय शाह यांनी म्हटलं.

हेही वाचा : इंग्लंड-वेल्सचे चाहते एकमेकांसोबत भिडले; खुर्च्या आणि लाथांनी केली मारहाण, पाहा व्हिडिओ

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना पार पडला. २९ मे २०२२ साली झालेल्या या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात १०१,५६६ प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 22:37 IST

संबंधित बातम्या