BCCI warns skipping domestic red-ball games will have severe implications : भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर भारतीय खेळाडू पुढील दोन महिने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांसाठी खेळताना दिसणार आहेत. आयपीएलनंतर लगेचच भारताला टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये भाग घ्यायचा आहे. खेळाडूंच्या अशा व्यस्त वेळापत्रकात भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

फ्रँचायझींना बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार –

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच जाहीर केले आहे की, रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आता आयपीएलपूर्वी खेळाडूंच्या कामाचा ताण लक्षात घेऊन बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना विशेष सूचना दिल्या आहेत. ही माहिती देताना, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘आयपीएल फ्रँचायझींना बीसीसीआयने केंद्रीय कंत्राटी खेळाडूंसाठी निर्धारित केलेल्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Updates
KKR vs RR : कोलकातामध्ये आरआर आणि केकेआर यांच्यातील सामन्यात होऊ शकतो बदल, जाणून घ्या काय आहे कारण?

बीसीसीआयने खेळाडूंना दिला इशारा –

बीसीसीआयचे सचिव जय शाह पुढे म्हणाले की, ‘बोर्डाचा आदेश आहे. बोर्ड ही सर्वोच्च संस्था आहे आणि तो जो काही निर्णय घेईल तो फ्रेंचायझींना पाळावा लागेल. आम्ही फ्रेंचायझींच्या वर आहोत.’ जय शाह म्हणाले की, ‘जर खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायचे असेल, तर त्यांना रणजी ट्रॉफीमध्ये हजेरी लावावी लागेल आणि आपल्या राज्यासाठी खेळावे लागेल.’

हेही वाचा – IND vs ENG : मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ची काढली हवा, भारताकडे पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी

रणजी करंडक कोणत्याही किंमतीत खेळावा लागेल –

वास्तविक, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून भारतीय संघात सामील झालेला नाही. अशा स्थितीत तो रणजी करंडक खेळू शकला असता. मात्र, किशन तेथेही झारखंडकडून खेळताना दिसला नाही. या गोष्टींबाबत मंडळ संतप्त झाले होते.
याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘बीसीसीआय कोणतीही गय खपवून घेणार नाही. या प्रकरणी ते मुख्य निवडकर्त्याला मोकळीक देणार आहेत. तसेच जर एखाद्या खेळाडूने हा निर्णय मान्य केला नाही, तर बोर्ड त्याच्यावर कठोर कारवाई करू शकतो.’ यासोबतच आयपीएल खेळण्यासाठी रणजी ट्रॉफीमध्ये तीन किंवा चार सामने खेळण्याचा निर्णयही बोर्ड घेऊ शकतो.