Ben Stokes Tweets After Pulling Out Retirement : बेन स्टोक्सने २०२३ विश्वचषकापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेतली आहे. २०१९ मध्ये इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली, इंग्लंड वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या संघात या खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. स्टोक्सने निवृत्तीनंतर पुनरागमन करण्यासाठी अष्टपैलू मोईन अलीकडून प्रेरणा घेतली आहे. निवृत्तीवरून परतल्यानंतर त्यांनी केलेल्या ट्विटने याची पुष्टी केली आहे. जॅक लीचच्या दुखापतीनंतर मोईनने ॲशेस मालिकेसाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेतली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत राहिल्यानंतर त्याने पुन्हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

मोईन अली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या ॲशेस कसोटी मालिकेसाठी निवृत्ती मागे घेताना, ॲशेस मालिकेसाठी स्टोक्सने केलेल्या मेसेजचा खुलासा केला. मोईनने याला उत्तर देताना लिहिले, एलओएल. मोईनने यावेळी सांगितले की, त्याला वाटले की स्टोक्स विनोद करत आहे, कारण जॅक लीचला दुखापत झाल्याचे त्याला माहित नव्हते. यानंतर दोघांमध्ये थोड्यावर चर्चा झाली आणि मोईनने निवृत्ती मागे येण्यास होकार दिला.

Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेतल्यानंतर बेन स्टोक्सने केले ट्विट –

आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बेन स्टोक्सने ट्विटमध्ये एलओएल (लॉट्स ऑफ लव्ह) लिहिले आहे. मोईन अलीकडून प्रेरणा घेऊन त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे त्याचे हे ट्विट साक्षीदार आहे. स्टोक्ससाठी आव्हान कमी नसेल. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा दुखापत झालेला गुडघा. तो अनफिट असतानाही ॲशेस खेळला. यादरम्यान त्याला जास्त गोलंदाजी करता आली नाही. ॲशेस मालिका संपल्यानंतर तो म्हणाला होता की, मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेणार नाही आणि गरज पडल्यास गुडघ्यावर शस्त्रक्रिया करेन.

हेही वाचा – Prithvi Shaw Knee Injury : पृथ्वी शॉच्या झंझावाती फलंदाजी लागला ब्रेक, दुखापतीमुळे कौंटी क्रिकेट स्पर्धेतून पडला बाहेर

२०१९ च्या विश्वचषक फायनलमध्ये स्टोक्स ठरला होता सामनावीर –

२०१९ च्या विश्वचषक फायनलमध्ये सामनावीर ठरलेल्या बेन स्टोक्सने गेल्या वर्षी जुलैमध्ये कसोटी कर्णधारपद स्वीकारले. त्यानंतर लगेचच एकदिवसीय फॉर्मेमधून निवृत्ती घेतली. तो म्हणाला होता की, खेळाचे सर्व फॉरमॅट खेळणे त्याच्यासाठी खूप कठिण झाले आहे. जेतेपदाचा बचाव करण्यासाठी स्टोक्सने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी इंग्लंड क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाची इच्छा होती. त्यानंतर आता बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेतली आहे.