भारताच्या महेश भूपतीने आपला फ्रेंच साथीदार मायकेल लॉड्राच्या साथीने खेळताना दुबई टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. या बिगरमानांकित जोडीने चुरशीच्या लढतीत तृतीय मानांकित रॉबर्ट लिंड्स्टेड आणि नेनांद झिम्नोजिक जोडीवर ७-६ (६), ७-६ (६) अशी मात केली. यंदाच्या हंगामातील भूपतीचे हे पहिलेच जेतेपद आहे. या स्पर्धेत भूपतीने हे पाचवे जेतेपद संपादन केले आहे. विशेष म्हणजे पाचही वेळा त्याने विभिन्न साथीदारांसह खेळताना जेतेपद पटकावले आहे. १९९८मध्ये त्याने लिएण्डर पेससह तर २००४ मध्ये फॅब्रिस सॅनटोरोच्या साथीने जेतेपदाची कमाई केली होती. याचप्रमाणे २००८मध्ये मार्क नॉवेल्स तर २०१२मध्ये रोहन बोपण्णासोबत खेळताना त्याने जेतेपद नावावर केले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2013 रोजी प्रकाशित
भूपती-लॉड्रा अजिंक्य
भारताच्या महेश भूपतीने आपला फ्रेंच साथीदार मायकेल लॉड्राच्या साथीने खेळताना दुबई टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. या बिगरमानांकित जोडीने चुरशीच्या लढतीत तृतीय मानांकित रॉबर्ट लिंड्स्टेड आणि नेनांद झिम्नोजिक जोडीवर ७-६ (६), ७-६ (६) अशी मात केली.

First published on: 03-03-2013 at 02:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhupati lyondra unbeatable