बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आयपीएलचे चॅम्पियन्स मुंबई इंडियन्स संघाची मंगळवारी भेट घेतली. रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर मिळवलेल्या रोमांचक विजयानंतर मुंबईने आयपीएलच्या चषकावर तिसऱ्यांदा विजयाची मोहोर उमटवली. ‘बिग बी’ क्रिकेटचे चाहते आहेत. भारतीय संघाचे सामने ते आवर्जुन पाहात असतात. भारतीय संघाच्या विजयाचं सेलिब्रेशन करतानाही आपण त्यांना अनेकदा पाहिलं आहे. आयपीएलमध्ये ‘बिग बी’ यांचा मुंबई इंडियन्सच्या संघाला पाठिंबा असतो. अनेकदा त्यांनी मुंबईच्या सामन्यांचा स्टेडियममध्ये उपस्थित राहून आनंद लुटला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबादमध्ये मुंबईने रविवारी विजेतेपद पटकावल्यानंतर संघ मुंबईत दाखल झाल्यानंतर ‘बिग बी’ यांनी वेळ काढून संघाची भेट घेतली. मुंबईच्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले. अमिताभ यांनी मुंबईच्या संघातील पंड्या बंधूंसोबतचे फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहेत. यात त्यांनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची भेट घेऊन विजयाचा आनंद साजरा केल्याचं म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची भेट झालेला दिवस अद्भुत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

मुंबईने रविवारी पुण्याचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलचे तिसऱ्यांदा विजेतपद पटकावण्याचा पराक्रम केला. सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत १३० धावांपर्यंतच मजल मारली होती. प्रत्त्युतरात मुंबईच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पुण्याच्या धावसंख्येला आळा घालून सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. यात मुंबईने अखेरच्या क्षणी पुण्यावर रोमांचक विजय प्राप्त केला. मुंबईकडून कुणाल पंड्याने ४५ धावांची खेळी साकारली. तर अखेरच्या षटकात मिचेल जॉन्सनने दोन विकेट घेऊन मुंबईसाठी सामना खेचून आणला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big b amitabh bachchan meets mumbai indians team
First published on: 23-05-2017 at 19:30 IST