Rishabh Pant, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला आहे. दरम्यान प्रथम गोलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा उपकर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला मैदान सोडून बाहेर जावं लागलं आहे.

ऋषभ पंत मैदान सोडून बाहेर

या सामन्यातील पहिल्याच डावात भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. ऋषभ पंत यष्टिरक्षण सोडून मैदानाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टिरक्षण करण्यासाठी मैदानात आला आहे. त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. आधी फिजिओ मैदानात आले आणि त्याच्या बोटाला स्प्रे मारला. त्यानंतर तो यष्टिरक्षण करण्यासाठी सज्ज झाला. पण ३५ व्या षटकात त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टिरक्षण करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

फलंदाजीत दमदार कामगिरी

ऋषभ पंतची दुखापत ही भारतीय संघासाठी गंभीर बाब आहे. कारण तो फलंदाजीत तुफान फॉर्ममध्ये आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात त्याने शतकं झळकावली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. त्यामुळे तो मैदानावर असणं खूप महत्वाचं आहे. त्याची दुखापत फार गंभीर नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे तो लवकरच मैदानावर पुनरागमन करू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात इंग्लंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. मात्र, इंग्लंडला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. इंग्लंडची सलामी जोडी स्वस्तात माघारी परतली आहे. जॅक क्रॉली आणि बेन डकेट दोघेही स्वस्तात बाद होऊन माघारी परतले आहेत. नितीश कुमार रेड्डीने आपल्या पहिल्याच षटकात दोघांनाही बाद करत माघारी धाडलं. इंग्लंडला ४२ धावांवर पहिला धक्का बसला. तर ४३ धावांवर इंग्लंडला दुसरा धक्का बसला. मात्र, त्यानंतर जो रूट आणि ओली पोपने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला आहे. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली आहे.