देशामध्ये स्वच्छता अभियान सुरू असताना क्रिकेटही स्वच्छ असायला हवे, यासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बिशनसिंग बेदी हे पुढे आले असून त्यांनी ‘स्वच्छ डीडीसीए अभियान’ सुरू केले आहे. असोसिएशनचे माजी अध्यक्ष स्नेह बन्सल आणि सचिव अनिल खन्ना यांच्यावर भ्रष्टाचार आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात आयपी एक्स्टेन्शन पोलीस तक्रार दाखल केली आहे.
‘‘ असोसिएशनमधील पैशांचा आणि सत्तेचा दुरुपयोग या व्यक्ती करीत असल्याचा आरोप यापूर्वीही मी केला होता. पण त्या वेळी माझ्याकडे कुणी लक्ष दिले नव्हते. बीसीसीआयकडून मिळालेल्या पैशांचे असोसिएशनने नेमके काय केले, याचे उत्तर यांच्याकडे नाही. त्याचबरोबरच पैशांच्या व्यवहाराबद्दल त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.