फिफाचे मावळते अध्यक्ष आणि ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य सेप ब्लाटर पुढील आठवडय़ात लुसाने येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) बैठकीला हजर राहणार नसल्याचे फिफाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘‘एप्रिल महिन्यात फिफाच्या अध्यक्षांनी लुसानेमध्ये होणाऱ्या बैठकीला आपण हजर राहू शकणार नसल्याचे आयओसीला कळवले होते,’’ असे फिफाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. सलग पाचव्यांदा फिफाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर चारच दिवसांनी मंगळवारी ब्लाटर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.