मुलापेक्षा सहा वर्ष छोट्या तरुणाला डेट करत आहे स्टार फुटबॉलर नेमारची आई

नेमारची ५२ वर्षीय आई नादीन गोनकाल्विस सध्या एका २२ वर्षाच्या तरुणाला डेट करत आहे

ब्राझिलचा स्टार फुटबॉलर नेमार जुनिअर नेहमी चर्चेत असतो. पण यावेळी तो चर्चेत असण्यामागचं कारण त्याची आई नादीन गोनकाल्विस आहे. नेमारची ५२ वर्षीय आई नादीन गोनकाल्विस सध्या एका २२ वर्षाच्या तरुणाला डेट करत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा तरुण नेमारपेक्षा सहा वर्ष छोटा आहे. नादीन यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

नादीन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नादीन आपला बॉयफ्रेड टियागा रामोससोबत बागेत उभी आहे. फोटोत दोघेही एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिली आहे की, “हे व्यक्त केलं जाऊ शकत नाही. तुम्ही हे जगत असता”. यानंतर त्यांनी एक हार्ट इमोजीदेखील दिली आहे.

नादीन यांची भेट होण्याच्या आधीपासूनच टियागो नेमारचा खूप मोठा चाहता होता. आपण २०१७ मध्ये त्याच्यासाठी एक संदेश पाठवला होता असं तो सांगतो. “नेमार तू जबरदस्त आहेस, मला कळत नाहीये, तुझ्यासारख्या व्यक्तीचा चाहता होण्याची भावना शब्दात कशी मांडावी. मी तुझ्यापासून खूप प्रेरणा घेतो. आशा आहे एक दिवस हा संदेश मी तुझ्यासोबत वाचेन”. पुढे त्याने म्हटलं होतं की, “मला माहिती आहे एक दिवस मी तुला नक्की भेटणार. कारण मी एक ड्रीम बॉय आहे जो कधीच आपलं लक्ष्य सोडत नाही”.

नादीन यांनी लग्नाच्या २५ वर्षानंतर २०१६ मध्ये नेमारच्या वडिलांपासून घटस्फोट घेतला होता. महत्त्वाचं म्हणजे नादीन आणि टियागो यांच्या वयात ३० वर्षांचं अंतर असतानाही नेमारने त्यांच्या नात्याला पाठिंबा दिला आहे. नेमारने आपल्या आईच्या पोस्टवर कमेंट करताना म्हटलं आहे की, “आनंदी राहा आई, लव्ह यू”. इतकंच नाही तर नेमारचे वडील रिबेरो यांनीही नादीनला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Brazil star footballer neymar mother nadine goncalves dating 22 years old boy sgy

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या