बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू हे समीकरण फार जुनं आहे. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंच्या प्रेम प्रकरणाचे अनेक किस्से आतापर्यंत आपण ऐकले आहेत. अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्नही केलंय. भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे याचं उत्तम उदाहरण…आयपीएलमुळे अनेकदा बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू एकत्र आलेले आपण पाहिले. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने नुकतच आपल्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल सांगितलं आहे. प्रिती झिंटा ही ब्रेट लीची बॉलिवूडमधली आवडती अभिनेत्री आहे. एका यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ब्रेट लीने हा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केलेल्या प्रिती झिंटाने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सह-मालकी स्विकारली आहे. ब्रेट लीने आयपीएलमध्ये काही हंगाम प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचंही प्रतिनीधत्व केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या ब्रेट लीने ७६ कसोटी, २२१ वन-डे आणि २५ टी-२० सामन्यांत आपल्या संघाचं प्रतिनिधीत्व केलंय. २०१५ साली ब्रेट लीने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brett lee names preity zinta as his favourite bollywood actress psd
First published on: 29-07-2020 at 09:26 IST