Cameron Green misses double century : वेलिंग्टन येथे यजमान न्यूझीलंड आणि यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याक कॅमेरून ग्रीनने ऐतिहासिक खेळी खेळून ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी सामना अतिशय रोमांचक बनवला आहे. वेलिंग्टन कसोटी सामन्यात एकेकाळी यजमान न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्सवर २६७ धावांत गुंडाळले होते. पण यानंतर कॅमेरून ग्रीनने किवी गोलंदाजांना क्रिकेटमधील असा धडा शिकवला जो ते सहजासहजी विसरणार नाहीत. अष्टपैलू ग्रीनने एका बाजूने तुफानी फलंदाजी करत धावसंख्या २६७/९ वरून ३८३ पर्यंत नेली.

कॅमेरून ग्रीन आणि जोश हेझलवूडची शानदार भागीदारी –

शेवटचा फलंदाज बाद झाल्यामुळे कॅमेरून ग्रीनचे द्विशतक नक्कीच हुकले, पण कसोटी इतिहासातील सर्वोत्तम खेळी म्हणून त्याच्या खेळीची नोंद केली जाईल. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीनचे हे दुसरे कसोटी शतक आहे. त्याने जोश हेझलवूडसोबत शेवटच्या विकेटसाठी ११६ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली आणि संघाला ३८३ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही संघाच्या फलंदाजांनी दहाव्या विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा हा विक्रम आहे. १०व्या विकेटसाठीच्या एकूण सर्वात मोठ्या भागीदारीबद्दल बोलायचे, तर हा विक्रम इंग्लंडच्या जो रूट आणि जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. २०१४ मध्ये भारताविरुद्धच्या नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात जो रूट आणि जेम्स अँडरसन यांनी १९८ धावा केल्या होत्या.

Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Shubman Gill Surpasses Virat Kohli and Sanju Samson in Unique Record
IPL 2024: शुबमन गिलने विराट-सॅमसनला मागे टाकत रचला इतिहास, आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore Match Updates in marathi
RR vs RCB : विराट कोहलीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, आयपीएलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला संयुक्त पहिला खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ९ गड्यांच्या मोबदल्यात २७९ धावा केल्या होत्या. त्यानंतर कॅमेरून ग्रीन १०३ आणि जोश हेझलवूड (०) नाबाद होते. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाला ३०० धावांच्या आत बाद करेल, असे वाटत असेल, पण कॅमेरून ग्रीनने काही वेगळाच विचार केला होता. त्याने जोश हेझलवूडसोबत शेवटच्या विकेटसाठी ११६ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली आणि संघाला ३८३ धावांपर्यंत मजल मारली.

हेही वाचा – Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित

कॅमेरून ग्रीनने या डावात २७५ चेंडूत १७४ धावा केल्या. या खेळीत त्याने २३ चौकार आणि ५ षटकार मारले. कॅमेरून ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावरून तो द्विशतक पूर्ण करेल असे वाटत होते. पण ११व्या क्रमांकाचा फलंदाज जोश हेझलवूड किती सपोर्ट देऊ शकणार होता? अखेर मॅट हेन्रीच्या एका चेंडूवर त्याने चूक केली आणि रचिन रवींद्रने त्याचा झेल घेऊन ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. हेझलवूडने ६२ चेंडूंचा सामना केला आणि बाद होण्यापूर्वी २२ धावा केल्या.

हेही वाचा – Shreevats Goswami : क्रिकेट जगतात खळबळ! बंगालच्या माजी क्रिकेटपटूने केला मॅच फिक्सिंगचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण?

ग्रीनने संपूर्ण संघापेक्षा केल्या जास्त धावा –

कॅमेरून ग्रीनच्या खेळीचे महत्त्व यावरून समजू शकते की संघाचे इतर १० फलंदाजही त्याने जितक्या धावा काढल्या तितक्या धावा करू शकले नाहीत. ग्रीनने १७४ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित १० फलंदाजांनी १६८ धावा केल्या. ग्रीननंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज मिचेल मार्श ठरला. त्याने ४० धावांची खेळी केली. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला अतिरिक्त ४१ धावांची भेट दिली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला १७९ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ७१ धावांचे योगदाने दिले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद १३ धावा केल्या असून ख्वाजा आणि लायन नाबाद आहेत.