देशासाठी पदक जिंकणाऱ्या किंवा जिंकू शकणाऱ्या सक्षम खेळाडूंना शासनाने आर्थिक स्वरूपाची मदत दिली असून अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला या गोष्टीचा चांगला फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सक्षम खेळाडूंना शासकीय योजना मिळायला हवी, असे मत सायनाने व्यक्त केले आहे.
मार्चमध्ये झालेल्या प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड खुल्या अजिंक्यपद स्पध्रेत अंतिम फेरी गाठणाऱ्य सायनाला सरकारकडून २५ लाख रुपयांचा धनादेश दिला. ‘‘जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्यासाठी सक्षम आहेत, त्यांना योजनेचा लाभ मिळायला हवा. या योजनेमुळे आम्हाला चांगलाचा पाठिंबा मिळाला आहे. माझे काम फक्त खेळावर लक्ष केंद्रित करण्यापुरतेच राहिले आहे,’’ असे सायना म्हणाली.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2015 रोजी प्रकाशित
सक्षम खेळाडूंना शासकीय योजना मिळायला हवी – सायना
देशासाठी पदक जिंकणाऱ्या किंवा जिंकू शकणाऱ्या सक्षम खेळाडूंना शासनाने आर्थिक स्वरूपाची मदत दिली असून अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला या गोष्टीचा चांगला फायदा झाला आहे.

First published on: 09-05-2015 at 04:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Capable players should get government scheme