पॅरिस : कार्लोस अल्कराझ आणि इगा श्वीऑटेक या दोन्ही गतविजेत्यांनी आपली आगेकूच कायम राखली. पुरुष एकेरीच गुडघ्याची दुखापत विसरुन खेळणाऱ्या कॅस्पर रूडला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

पुरुष एकेरीत अल्कराझने विजय मिळविला असला, तरी त्याला एक सेट गमवावा लागला. अल्कराझने फॅबिअन मारोझसानचे आव्हान ६-१, ४-६, ६-१, ६-२ असे परतवून लावले. पुरुष एकेरीत पोर्तुगालच्या नुनो बोर्जेसने दुसऱ्या फेरीत सर्वात सनसनाटी निकालाची नोंद करताना नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा २-६, ६-४, ६-१, ६-० असा पराभव केला. इटलीच्या आठव्या मानांकित लॉरेन्झो मुसेट्टीने डॅनिएल गुलानचा ६-४, ६-०, ६-४ असा पराभव केला.

महिला एकेरीत श्वीऑटेकने २०२१च्या अमेरिकन विजेत्या एमा रॅडुकानूवर ६-१, ६-२ अशी सहज मात केली. चीनच्या पॅरिस ऑलिम्पिक विजेत्या क्विनवेन झेंग हिने आपली आगेकूच कायम राखताना एमिलिआना अॅरांगोचा ६-२, ६-३ असा सहज पराभव केला. चौथ्या मानांकित जॅस्मिन पाओलिनीने आयला टोमयानोविच हिचे आव्हान ६-३, ६-३ असे परतवून लावले.

युकी, बोपण्णाची विजयी सलामी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताच्या युकी भांबरीने अमेरिकेच्या रॉबर्ट गॅलोवेच्या साथीत पुरुष दुहेरीत विजय मिळविला. युकी-रॉबर्ट जोडीने रॉबिन हॅसे-हेन्ड्रिक जेबेन्सचे आव्हान ६-३, ६-७(८-१०), ६-३ असे परतवून लावले. रोहन बोपण्णा व चेक प्रजासत्ताकच्या अॅडम पावलासेक जोडीने अमेरिकेच्या रॉबर्ट कॅश व जेम्स ट्रेसी जोडीला ७-६ (८-६), ५-७, ६-१ असे पराभूत केले.