उत्कंठापूर्ण लढतीत विस्टाकोर संघाने डी.वाय.पाटील संघावर केवळ एका धावेने मात केली आणि चंदू बोर्डे चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांच्यापुढे एअर इंडियाचे आव्हान असेल. अन्य लढतीत लश लाईफ संघाने हेमंत पाटील इलेव्हनला सात विकेट्स राखून हरविले. उपांत्य फेरीत लश लाईफ संघास इंडियन ऑईल संघास सामोरे जावे लागणार आहे.
 संक्षिप्त निकाल-१.विस्टाकोर-२० षटकांत ५ बाद २०९ (विराट वाटे नाबाद ८०, अमेय सोमण ९६, प्रथमेश ढाके ३/३५) वि.वि. डी.वाय.पाटील इलेव्हन-२० षटकांत ८ बाद २०८ (शुभम रांजणे नाबाद ६५, शोएब शेख ३७, अमित पागनीस ३५, लक्ष्मण आतकरे ४/४७, सुनील यादव २/४०) २.हेमंत पाटील इलेव्हन १९.१ षटकांत ११० (विनय पाटील ६०, नितीश साळेकर ४/१२) पराभूत वि. लश लाईफ-१७.३ षटकांत ३ बाद ११३ (अभिजीत साळवी ४७, अिजक्य नाईक नाबाद ४४).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandu borde t20 cricket cup
First published on: 30-01-2015 at 04:43 IST