BCCI’s list of seven players with suspect bowling action : आयपीएल २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. या लिलावात अनेक खेळाडूंनी भाग घेतला असून त्यापैकी एकाचे नाव चेतन सकारिया आहे. चेतन हा डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे, त्याला या वर्षी लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने सोडले आहे. चेतनने आयपीएलच्या लिलावातही आपले नाव नोंदवले आहे, मात्र लिलावाच्या काही दिवस आधी बीसीसीआयने चेतनला संशयास्पद गोलंदाजीची शैली असलेल्या सात खेळाडूंच्या यादीत टाकले आहे.

चेतन सकारियाच्या अडचणी वाढल्या –

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि खेळाडूच्या जवळच्या सूत्रांनी बीसीसीआयने संशयास्पद गोलंदाजीची शैली असलेल्या यादीमध्ये सकारियाचा समावेश केल्याबद्दल माहिती दिली. बीसीसीआयने चेतनच्या गोलंदाजीवर आक्षेप घेत ती संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. चेतन गेल्या काही वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. तो यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता, तेथे चांगली कामगिरी केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात ४.२० कोटी रुपये देऊन त्याला आपल्या संघात सामील केले. मात्र, तो दिल्लीसाठी काही खास करू शकला नाही, त्यामुळे दिल्लीने त्याला यंदाच्या लिलावापूर्वी सोडले.

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
not to share any photo or video of the stadium on their accounts on the day of the match.
IPL 2024 : मीडिया हक्कांबाबत बीसीसीआयची कठोर भूमिका, संघ-खेळाडू आणि समालोचकांना दिल्या ‘या’ विशेष सूचना
Jasprit Bumrah taking five wickets against RCB in IPL 2024
MI vs RCB : जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी इतका धोकादायक का आहे? आपल्या यशाचे गुपित स्वत:च केले उघड
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

या कारणास्तव चेतन साकारियाने आयपीएल लिलावात स्वतःची नोंदणी केली आहे आणि त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. भारतीय डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने चेतनसारख्या गोलंदाजाला आयपीएल लिलावात जास्त मागणी आहे, पण आता बीसीसीआयने त्याच्या गोलंदाजीच्या शैली आक्षेप घेत लिलावाचा मार्ग अवघड केला आहे. बीसीसीआयने चेतनसह त्या सर्व गोलंदाजांची माहिती फ्रँचायझींना दिली आहे, ज्यांची नावे संशयास्पद गोलंदाजीची शैली असलेल्या यादीत समाविष्ट आहेत. मात्र, बीसीसीआयने चेतनला गोलंदाजी किंवा आयपीएल लिलावात बंदी घातलेली नाही. चेतन व्यतिरिक्त, तनुष कोटियन, चिराग गांधी, सलमान नझीर, सौरभ दुबे आणि अर्पित गॅलेरिया यांच्या नावाचाही बीसीसीआयच्या संशयास्पद गोलंदाजीची शैली असलेल्या यादीत समावेश आहे.

हेही वाचा – IPL 2024 : हार्दिक पंड्याला ‘MI’चा कर्णधार नियुक्त केल्यानंतर सूर्यकुमार यादव नाराज? इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल

चेतनची आयपीएल कारकीर्द –

चेतनने आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले आणि पहिल्या सत्रातच त्याने १४ विकेट्स घेतल्या, पण राजस्थान संघाने त्याला सोडले आणि त्यानंतर आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात दिल्ली संघाने त्याला विकत घेतले. आता दिल्ली दिल्ली संघाने त्याला सोडले आहे. आतापर्यंत एकूण १९ आयपीएल सामने खेळले आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी एक वनडे आणि दोन टी-२० सामनेही खेळले आहेत.