सलामीवीर निक कॉम्प्टन आणि जोनाथन ट्रॉट यांच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर २ बाद २६७ अशी मजल मारली आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकला (१७) झटपट गुंडाळत चांगली सुरुवात केली, पण त्यानंतर कॉम्प्टन आणि ट्रॉट यांनी दुसऱ्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. कॉम्प्टनने बाद होण्यापूर्वी १५ चौकारांच्या जोरावर १०० धावांची खेळी साकारली, तर ट्रॉटने १५ चौकारांच्या जोरावर नाबाद १२१ धावांची खेळी साकारली. खेळ संपला तेव्हा ट्रॉट नाबाद १२१ आणि केविन पीटरसन नाबाद १८ वर खेळत होते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2013 रोजी प्रकाशित
कॉम्प्टन, ट्रॉटची शतके; इंग्लंड २ बाद २६७
सलामीवीर निक कॉम्प्टन आणि जोनाथन ट्रॉट यांच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर २ बाद २६७ अशी मजल मारली आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकला (१७) झटपट गुंडाळत चांगली सुरुवात केली,

First published on: 15-03-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compton trott seize control for england