CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत. पण असे असले तरी सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आफ्रिदीचं कौतुक करताच नेटक-यांनी भज्जी, युवीला घेतलं फैलावर

अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावली आहे. क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिनेदेखील करोनाग्रस्तांना मदत केली आहे.

कौतुकास्पद! १५ वर्षाच्या मुलीने करोनाग्रस्तांसाठी केली ३० हजारांची मदत

योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. म्हणूनच सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुंबईकर रोहित शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिने करोनाग्रस्तांसाठी २१ लाखांची मदत केली आहे. तसेच नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.

रोहित शर्माची करोनाविरोधात ‘बॅटिंग’; केली ८० लाखांची मदत

त्याआधी रोहित शर्माने ८० लाखांचा निधी दिला. अनुष्का आणि विराट यांनीही पीएम-केयर्स फंड आणि मुख्यमंत्री सहायता निधीला (महाराष्ट्र) साथ देणार असल्याचे सांगितले. तसेच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी २५ लाख, बीसीसीआयने ५१ कोटी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने ५० लाख केंद्र आणि राज्य सरकारला देण्याची घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus ravindra jadeja wife rivaba donated 21 lakh to pm cares fund from personal savings amid covid 19 crisis vjb
First published on: 01-04-2020 at 11:25 IST