दे धक्का!

चेंडूवर सर्वाधिक वेळ ताबा, पासिंगचे सुरेख कौशल्य, सातत्यपूर्ण आक्रमण याच्या जोरावर कोस्टा रिकाने इटलीसारख्या बलाढय़ प्रतिस्पध्र्याना १-० असा पराभवाचा धक्का दिला.

चेंडूवर सर्वाधिक वेळ ताबा, पासिंगचे सुरेख कौशल्य, सातत्यपूर्ण आक्रमण याच्या जोरावर कोस्टा रिकाने इटलीसारख्या बलाढय़ प्रतिस्पध्र्याना १-० असा पराभवाचा धक्का दिला. उरुग्वेवर ३-१ने विजय आणि आता इटलीवर मात करून कोस्टा रिकाने दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे. २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच कोस्टा रिकाने अंतिम १६ जणांमध्ये स्थान मिळवण्याची किमया साधली. कोस्टा रिकाच्या विजयामुळे इंग्लंडवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची वेळ आली.
इटलीच्या गोलक्षेत्रात आक्रमण चढवण्याच्या कोस्टा रिकाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना पहिल्या सत्राच्या दोन मिनिटांआधी यश आले. ४४व्या मिनिटाला दियाझने दिलेल्या अप्रतिम पासवर ब्रायन रुइझने हेडरद्वारे गोल केला. त्याने मारलेला फटका गोलबारला लागून गोलरेषेच्या आत पडला. गोलरेषा तंत्रज्ञानाद्वारे कोस्टा रिकाच्या बाजूने कौल लागला. हाच गोल कोस्टा रिकाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला.
३१व्या मिनिटाला इटलीचा हुकूमी एक्का मारिओ बालोटेलीने गोल करण्याची संधी वाया घालवली. आंद्रिया पिलरेने दिलेल्या पासवर कोस्टा रिकाच्या बचावपटूंना भेदत बालोटेलीने चेंडूवर ताबा मिळवला. मात्र कोस्टा रिकाचा गोलरक्षक नवासला चकवून गोल करण्याचा त्याचा प्रयत्न फसला. पुढच्याच मिनिटाला आंद्रिया पिलरेकडूनच मिळालेल्या पासवर बालोटेलीने जोरदार फटका लगावला. पण नवासने अप्रतिम बचाव करत त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. ५३व्या मिनिटाला पिलरेच्या फ्री किकचा प्रयत्न नवासने उजवीकडे झेपावत रोखला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Costa rica vs italy clinical costa rica stun italy to reach knockouts

ताज्या बातम्या