अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान दौर्‍याची घोषणा केली आहे. १९९८ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ३ कसोटी, ३ एकदिवसीय आणि एक टी-२० सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात ४ मार्चपासून कसोटी मालिकेने होणार असून दोन्ही देशांमधील पहिला कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ २७ फेब्रुवारीला इस्लामाबादला पोहोचणार आहे.

वेळापत्रकात बदल झाल्यानंतर पहिली कसोटी कराचीऐवजी रावळपिंडीत खेळवली जाणार आहे. त्याच वेळी, दुसरा कसोटी सामना लाहोरमध्ये होणार आहे. यानंतर दोन्ही संघ तिसऱ्या कसोटीसाठी लाहोरमध्ये जमतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट करून या दौऱ्याची माहिती दिली आणि वेळापत्रकही जाहीर केले.

पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया २०२२ पूर्ण वेळापत्रक

कसोटी मालिका

४-८ मार्च: पहिली कसोटी, रावळपिंडी

१२-१६ मार्च: दुसरी कसोटी, कराची

२१-२५ मार्च: तिसरी कसोटी, लाहोर

वनडे मालिका

२९ मार्च : पहिली वनडे, रावळपिंडी

३१ मार्च: दुसरी वनडे, रावळपिंडी

२ एप्रिल: तिसरी वनडे, रावळपिंडी

टी-२० सामना

५ एप्रिल: एकमेव टी-२० सामना, रावळपिंडी