आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधारपदाची दारे खुली झाली आहेत. मात्र अद्याप त्याच्या खांद्यावर कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आलेली नाही. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक असा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधारपदावरील बंदी हटवून तो पुन्हा कर्णधार म्हणून दिसू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या आचारसंहितेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये यासंदर्भात एक बैठक झाली होती. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, या बैठकीत जे काही निर्णय घेण्यात आले ते लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता डेव्हिड वॉर्नर त्याच्या बंदीच्या विरोधात अपील करू शकणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, केलेल्या बदलांनुसार, ”आताच्या नियमांनुसार, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ त्यांच्यावरील दीर्घ बंदी उठवण्याचे आवाहन करू शकतात.”

हेही वाचा – IND vs NZ: ‘सामन्यापूर्वी श्रेयसने माझ्यासोबत….’अय्यर हिट विकेट होताच ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला फोटो

बॉल टेम्परिंगनंतर डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधारपदावर बंदी घालण्यात आली होती –

वास्तविक डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळले होते. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथवर प्रत्येकी एक वर्षाची आणि बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणात डेव्हिड वॉर्नरची भूमिका सर्वोच्च होती आणि याच कारणामुळे त्याच्यावर कर्णधारपदावरही आजीवन बंदी घालण्यात आली होती. स्टीव्ह स्मिथवरही कर्णधारपदावर बंदी घालण्यात आली होती पण २०२१-२२ च्या ऍशेसपूर्वी त्याला ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते.

अलीकडेच, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी दिग्गज ग्रेग चॅपल यांनी डेव्हिड वॉर्नरवरील कर्णधारपदाची बंदी उठवण्याची मागणी केली होती. डेव्हिड वॉर्नरला पुरेशी शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे आता त्याच्यावरील कर्णधारपदाची बंदी उठवून त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket australia opens the door for david warner leadership return vbm
First published on: 21-11-2022 at 12:24 IST