Al-Nasr wins Arab Club Champions Cup 2023: शनिवारी रात्री, १२ ऑगस्ट २०२३ रोजी अरब क्लब चॅम्पियन्स कपचा फायनल सामना पार पडला. किंग फहद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अल नासरने क्लब चॅम्पियन्स कपवर नाव कोरले. अंतिम सामन्यात अल नासरने ख्रिस्तियानो रोनाल्डोसह ९ खेळाडूंनी खेळून अतिरिक्त वेळेत अल-हिलाल विरुद्ध २-१ असा विजय मिळवला. पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अल नासरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अल-नासरचे दोन्ही गोल ख्रिस्तियानो रोनाल्डोने केले.

ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी प्रो लीगमध्ये गेल्या मोसमात ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला होता. त्याचा संघ उपविजेता ठरला. मात्र, यंदा ३८ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्पर्धेत ६ गोल केले. त्याने आपला हंगाम सर्वाधिक गोल करणारा म्हणून पूर्ण केला. त्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डो गोल्डन बूटचा मानकरी ठरला.

RCB Captain Faf Du Plessis Fined 12 lakhs for Slow over Rate And PBKS Sam Curran Breach IPL Code of Conduct 50 percent Match
IPL 2024: पराभूत संघांच्या दोन्ही कर्णधारांवर कारवाई; डु प्लेसिसला १२ लाखांचा दंड, तर सॅम करनचं अर्ध मानधन कापलं
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Big blow for Lucknow Supergiants
IPL 2024 : आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर लखनऊला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज आयपीएलमधून झाला बाहेर

अरब क्लब चॅम्पियन्स चषक ही स्पर्धा अरब प्रदेशातील शीर्ष क्लब संघांमध्ये खेळवली जाते. त्यात सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, इराक, मोरोक्को, ट्युनिशिया आणि अल्जेरिया या संघांचा समावेश आहे. पूर्वार्धात अल-नासरच्या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, परंतु अल हिलालचा गोलरक्षक मोहम्मद अलोव्हाइसने सॅडिओ माने, सेकोउ फोफाना आणि मार्सेलो ब्रोझोविकचे प्रयत्न अपयशी ठरवले.

हेही वाचा – IND vs WI 4th T20 : “जर अमेरिकेत येऊन ‘हे’ नाही केले तर काय उपयोग”, पाहा शुबमन गिल आणि अर्शदीपचा मजेशीर VIDEO

सॅडिओ माने, सेकोउ फोफाना आणि मार्सेलो ब्रोझोविक हे अल नासरमध्ये नवीन जोडले गेलेले खेळाडू आहेत. उत्तरार्धात ६ मिनिटेही दोन्ही संघाला गोल करता आला नाही. त्यानंतर अल-हिलालच्या माल्कमने सहकारी ब्राझीलच्या मायकेलकडे चेंडू पास केला. मायकेलने फ्री हेडरने चेंडू गोलपोस्टवर नेला. यासह अल-हिलाल संघाने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.

रोनाल्डोने ७४ व्या मिनिटाला अल-नासरला बरोबरी साधून दिली –

या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो थोडा उशीरा फॉर्ममध्ये आला. पोर्तुगीज फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने ७४व्या मिनिटाला गोल करत अल-नासरला बरोबरी साधून दिली. ख्रिस्तियानो रोनाल्डोने राइट बॅकच्या सुलतान अल-घनमच्या लो क्रॉससह सलग पाचव्या सामन्यात गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये ७ मिनिटाच्या दरम्यान अल-नासरच्या २ खेळाडूंना बाहेर पाठवले गेले, परंतु गेम अतिरिक्त वेळेत नेण्यात ते यशस्वी ठरले.