भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. विंडीजविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने आपलं 38 वं शतक साजरं केलं. याचसोबत सलग 3 वन-डे सामन्यांमध्ये शतक झळकावणारा विराट पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. या खेळीनंतर विराटवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीसमोर एक आव्हान ठेवलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विराटच्या खेळीची स्तुती करताना शोएबने विराटला 120 शतकांचा टप्पा ओलांडण्याचं आव्हान दिलं आहे. Guwahati. Visakhapatnam. Pune.Virat Kohli is something else man with three ODI hundreds in a row, the first India batsman to achieve that .. what a great run machine he is ..Keep it up cross 120 hundred mark as I set up for you ..— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 27, 2018 कोहलीने तिसऱ्या सामन्यात शतक झळकावूनही भारताला सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सोमवारी मुंबईच्या ब्रेबॉन मैदानावर दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. तिसऱ्या सामन्यात मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. याचसोबत गोलंदाजीदरम्यान अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी वारेमाप धावा दिल्या. त्यामुळे चौथ्या एकदिवसीय सामन्यात संघाचा योग्य समतोल राखणं हे विराटसमोर मोठं आव्हान असणार आहे.