scorecardresearch

आधी निवृत्त झाल्याचे केले जाहीर, नंतर घेतली माघार? अंबाती रायडूच्या ट्विटमुळे संभ्रम

चेन्नई सुपर किंग्जचा मधल्या फळीतील दिग्गज फलंदाज अंबाती रायडूने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

AMBATI RAYUDU
अंबाती रायडू (फाईल फोटो)

चेन्नई सुपर किंग्जचा मधल्या फळीतील दिग्गज फलंदाज अंबाती रायडूने निवृत्त झाल्याचे जाहीर केले. आयपीएलचे सध्याचे म्हणजे १५ वे पर्व त्याचे शेवटचे असेल असे त्याने म्हटले आहे. ट्विट करत त्याने याबाबत माहिती दिली. मात्र लगेच त्याने हे ट्विट डिलीट केले. निवृत्ती जाहीर करुन पुन्हा ट्विट डिलीट केल्यामुळे आता त्याच्या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> काय पण नशीब! विराट कोहली कसा बाद झाला बघाल, तर तुम्ही पण हेच म्हणाल

ट्विट करत निवृत्त होत असल्याचे केले जाहीर

अंबाती रायडूने ट्विटच्या माध्यमातून आयपीएलचे हे माझे शेवटचे पर्व असल्याचे म्हटले आहे. “मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, आयपीएचे हे पर्व माझे शेवटचे असणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांसाठी जपळपास १३ वर्षासाठी खेळलो. हा १३ वर्षांचा काळ माझ्यासाठी खूप चांगला होता. माझ्या या प्रवासाबद्दल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही फ्रेंचायझींचे आभार,” असे रायडूने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >>> क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…”

पुन्हा ट्विट केल डिलीट

आयपीएलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर करताच क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू इरफान पठाण तसे इतरांनी रायडूला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या त्याच्या निर्णयाचेही अनेकांनी स्वागत केले. मात्र रायडूने काही वेळानंतर हे ट्विट डिलीट केले. त्यानंतर मात्र आता अनेक चर्चांना तोंड फुटले आहे. रायडूचे आयपीएल २०२२ हे शेवटचे पर्व असणार? की आगामी हंगामातही तो सीएसकेकडून खेळताना दिसेल, असा प्रश्न विचारला जातोय.

हेही वाचा >>>“CSK जा जा जा…” मुंबई विरुद्ध चेन्नईच्या मॅच दरम्यानचा वानखेडे स्टेडियमवरचा भन्नाट Video Viral

अंबाती रायडूने आयपीएलमध्ये २०१० साली पदार्पण केले. सुरुवातीला तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला. २०१० ते २०१७ सालापर्यंत त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर चेन्नईने त्याला २०१८ साली मेगा ऑक्सनमध्ये ६.७५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. तेव्हापासून तो चेन्नई संघात खेळताना दिसतोय. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १८७ सामने खेळले असून ४१८७ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Csk players ambati rayudu announced retirement and then deleted tweet prd

ताज्या बातम्या