IPL गाजवून CSK चा ऋतूराज परतला, पुणेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात केले स्वागत

आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नईडून खेळतांना पुणेकर ऋतुराज गायकवाडने सर्वांची मनं जिंकली.

ruturaj gaikwad pune
ऋतुराजचे आज पुण्यात आगमन झाले

आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नईडून खेळतांना पुणेकर ऋतुराज गायकवाडने सर्वांची मनं जिंकली. ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने २७ चेंडूत ३२धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आहे. आयपीएलमध्ये खेळल्या गेल्या १६ सामन्यात त्याने ६३५ धावा केल्या आहेत. या खेळीत १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकूण ६४ चौकार आणि २३ षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.

दरम्यान, ऋतुराजचे आज पुण्यात आगमन झाले आहे. पुणेकरांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. पुणेकरांनी फटाक्यांची आतषबाजी केली होती. यावेळी साधेपणा आणि परंपरेला जपणारा ऋतुराज सर्वांना भावला. आयपीएल २०२१ आणि करिअरमधील सर्वोत्तम खेळी करून तो पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या घरी परतला तेव्हा तो गाडीतून अनवाणी पायाने उतरला.

कोलकाताविरुद्ध याच सामन्यात चेन्नईच्या फाफ ड्युप्लेसिसची ऑरेंज कॅप अवघ्या दोन धावांनी हुकली. फाफनं १६ सामन्यात ६३३ धावा केल्या आहेत. यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. फाफने एकूण ६० चौकार आणि २३ षटकार ठोकले आहेत. कोलकाताविरुध्द फाफने ५९ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला. पण सीमेवर वेंकटेश अय्यर झेल घेतला आणि त्याचं ऑरेंज कॅपचं स्वप्न भंगलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Csk rituraj returns after ipl punekar welcomes him with fireworks srk

ताज्या बातम्या