अर्जेटिना आणि ज्युवेंट्सचा अव्वल फुटबॉलपटू कालरेस टेवेझच्या वडिलांचे अपहरण करून त्यांना अपहरणकर्त्यांनी जवळपास आठ तास अज्ञात स्थळी ठेवले होते. मात्र ३ हजार युरो देऊन सेगुंडो टेवेझ यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. मात्र याबाबत टेवेझच्या कुटुंबियांकडून किंवा अर्जेटिनाच्या पोलिसांकडून त्यांच्या सुटकेच्या बातमीला दुजोरा मिळाला नाही. ब्युनोस आयर्स येथे जात असताना सोमवारी सकाळी त्यांचे कारमधून अपहरण करण्यात आले होते. मँचेस्टर सिटी आणि मँचेस्टर युनायटेडचा माजी फुटबॉलपटू असलेल्या कालरेस टेवेझला ज्युवेंट्सने मायदेशी परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र वडिलांची सुटका झाल्यानंतर आता टेवेझ मायदेशी परतणार नसल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dad of former man city star carlos tevez freed after kidnapping
First published on: 31-07-2014 at 05:36 IST