धावांचा डोंगर रचत अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करणारा भारतीय क्रिकेट विश्वातला चमकता तारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होतो आहे. सचिनच्या लयबद्ध आणि आक्रमक खेळीने अनेकांना भुरळ घातली. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाच्या चेंडूचा खरपूस समाचार घेणारी ही बॅट काहीच दिवसांत म्यान होणार आहे. त्याच्या या निवृत्तीने केवळ भारतातीलच नव्हे; तर जगभरातील त्याचे चाहते व्यथित झाले आहेत. त्यामुळेच असंख्य चाहते विविध मार्गांनी क्रिकेटविश्वातील या दैवताला मानाचा मुजरा देत आहेत. तुम्हीसुद्धा ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या माध्यमातून या सर्वश्रेष्ठ खेळाडूला भावी आयुष्यासाठी शुभसंदेश देऊ शकता.
संदेश देण्यासाठी तुम्ही या पानावरील प्रतिक्रिया नोंदविण्याच्या सुविधेचा वापर करा.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2013 रोजी प्रकाशित
प्रिय सचिन!
धावांचा डोंगर रचत अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करणारा भारतीय क्रिकेट विश्वातला चमकता तारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होतो आहे.
First published on: 11-11-2013 at 12:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dear sachin