पर्थ : अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने आपले सर्व कौशल्य आणि अनुभव पणाला लावल्यानंतरही भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने बुधवारी झालेला तिसरा सामना २-१ असा जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत३-० अशी विजयी आघाडी घेतली.

पहिल्या दोन पराभवांनंतर तिसऱ्या सामन्यात मध्यरक्षकांबरोबर भारताच्या बचावफळीने आपला खेळ उंचावला होता. ऑस्ट्रेलियाची आक्रमकता आणि भारताचा बचाव असा सुरेख खेळ बघायला मिळाला. सामन्यातील सर्वात वेगवान खेळ आणि खेळातील सर्वाधिक तीव्रता उत्तरार्धात बघायला मिळाली. या वेळी नऊ मिनिटांत तीन गोल नोंदवले गेले. मात्र, यातील एकच गोल भारताला करता आला. जुगराजने ४१व्या मिनिटाला मिळालेला कॉर्नर सत्कारणी लावला. त्यानंतर मात्र जेरेमी हेवर्डने ४४ आणि ४९व्या मिनिटाला गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडीवर नेले. शेवटी हीच आघाडी ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite the efforts of pr sreejesh the indian hockey team lost amy
First published on: 11-04-2024 at 05:14 IST