Dhawal Kulkrani: धवल कुलकर्णीने आपल्या अखेरच्या रणजी सामन्यात शेवटचे षटक टाकताना विकेट घेत मुंबई संघाला जेतेपद पटकावून दिले. मुंबई संघाने रणजी ट्ऱॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भ संघाचा १६९ धावांनी पराभव केला. रणजी ट्रॉफीचा मुंबई विरूध्द विदर्भ हा अंतिम सामना धवलच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. ३५ वर्षीय धवलने २००७ मध्ये मुंबईसाठी पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी १२ एकदिवसीय आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले. या विजयासह धवलने भावूक होत निरोप घेतला.

आपल्या अखेरच्या सामन्यात धवन कुलकर्णीने ४ विकेट्स मिळवले. पहिल्या डावात धवलने महत्त्वपूर्ण ३ विकेट्स घेत १०५ धावांवर विदर्भला सर्वबाद करण्यात मोठी भूमिका बजावली. तनुष कोटीयन,तुषार देशपांडे, शम्स मुलाणी यांनी सर्वाधिक षटके टाकली आणि ते गोलंदाजीही चांगली करत होते आणि त्यांनी विकेट्सही मिळवल्या. तनुष आणि तुषारच्या ४ महत्त्वपूर्ण विकेट्सनंतर आता मुंबईला अखेरच्या विकेटची आवश्यकता होती. तनुष, तुषार चांगल्या लयीत होते पण तरीही कर्णधाराने सर्वात अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णीकडे गोलंदाजी सोपवली. कुलकर्णीनेही जास्त विलंब न करता उमेश यादवला क्लीन बोल्ड करत १०वी विकेट मिळवली आणि आपला अखेरचा सामना संस्मरणीय बनवला.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत रचला इतिहास, आयपीएलच्या १७ वर्षांत ही कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

धवल कुलकर्णीने सामन्यानंतर म्हणाला की, “मला गोलंदाजी मिळेल असे वाटले नव्हते, पण कर्णधार अजिंक्य रहाणेने सामना संपवण्यासाठी चेंडू माझ्याकडे सोपवला. त्याचे खूप आभार.” मुंबईला विजय मिळवून दिल्यानंतर धवल कुलकर्णी भावूक झाला होता.

७६ रणजी सामन्यांमध्ये तब्बल २४२ विकेट्स मिळवणाऱ्या धवलने आपल्या अखेरच्या सामन्यातही गोलंदाजीने छाप पाडली.कुलकर्णीने विजेतेपदाच्या सामन्यातील पहिल्या डावात ३ बळी घेतले. त्याने ११ षटकांत केवळ १५ धावा दिल्या. यात सलामीवीर फलंदाज अथर्व तायडे, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा अमन मोखाडे आणि करुण नायर यांच्या विकेट्सचा समावेश होता, या तिघांनाही धवलने झेलबाद केले. तर दुसऱ्या डावात उमेश यादवच्या रूपात त्याने एक विकेट घेतली.

धवलने भारतासाठी एकूण १२ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात १९ विकेट्स घेतले आहेत, तर २ टी-२० सामन्यांमध्ये त्याला ३ विकेट्स घेता आले. धवलचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. त्याने ९५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २८१ विकेट्स त्याच्या नावे आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये धवलने १३० सामन्यांमध्ये २२३ विकेट्स मिळवल्या आहेत.

मुंबई संघाने विदर्भला विजयासाठी ५३८ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना शतकी खेळी करणाऱ्या कर्णधार अक्षय वाडकर आणि फलंदाज हर्ष दुबे यांनी मोठी भागीदारी रचली. पण विदर्भ संघाचे शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले आणि त्यांनी मुंबईने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर १६९ धावांनी विजय मिळवत रणजी ट्रॉफी ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या नावे केली.