Pakistan’s Arshad Nadeem Breaks Olympic record & won Gold Medal in Javelin Throw: भालाफेकीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने नव्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. अर्शदच्या या पदकाने पाकिस्तानने गुणतालिकेतील बढती मिळवली आहे. पाकिस्तानला सुवर्णपदक याआधी कोणी जिंकून दिलंय जाणून घेऊया.

रोम इथे १९६० मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानच्या हॉकी संघाने सुवर्णपदकावर कब्जा केला होता. ते पाकिस्तानचं क्रीडा जगतातल्या सर्वोच्च स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक होतं.

हेही वाचा – नीरज चोप्राची रौप्यपदकाला गवसणी, ऐतिहासिक थ्रो करत पॅरिसमध्ये भारताला मिळवून दिलं पाचवं पदक

यानंतर मेक्सिको इथे १९६८ मध्ये झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानने सुवर्णपदकाची कमाई केली. १६ वर्षांनंतर हॉकी संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. अशाप्रकारे पाकिस्तानच्या नावावर ऑलिम्पिक स्पर्धेत तीन सुवर्णपदकं आहेत.

वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावणारा अर्शद नदीम (Arshad Nadeem) पाकिस्तानचा पहिलावहिला खेळाडू ठरला आहे.

दरम्यान मेलबर्न १९५६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानच्या हॉकी संघाला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. पाकिस्तानचं ऑलिम्पिक स्पर्धेतलं हे पहिलंवहिलं पदक.

हेही वाचा – Arshad Nadeem New Olympic Record: पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा ऑलिम्पिकमध्ये नवा रेकॉर्ड, तब्बल ९२.९७ मी लांब केला थ्रो

रोम इथे १९६० मध्ये झालेल्या स्पर्धेत मुहम्मद बशीरने कांस्यपदक पटकावलं होतं. टोकियो इथे १९६४ मध्ये झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानच्या हॉकी संघाला रौप्यपदक मिळालं होतं.

म्युनिक इथे १९७२ मध्ये झालेल्या स्पर्धेत हॉकी संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत रौप्यपदक नावावर केलं होतं. चार वर्षांनी माँट्रेअल इथे १९७६ मध्ये झालेल्या स्पर्धेत हॉकी संघाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

सोल इथे १९८८ मध्ये झालेल्या स्पर्धेत हुसेन शाहने मिडलवेट गटात कांस्यपदक जिंकलं होतं. चार वर्षानंतर बार्सिलोना इथे १९९२ मध्ये झालेल्या स्पर्धेत हॉकी संघाला कांस्यपदक मिळालं होतं.

हेही वाचा – Indian Hockey Team : भारतीय हॉकी संघावर पैशांचा पाऊस, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचे बक्षीस जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणात पाकिस्तानने ऑलिम्पिक स्पर्धेत ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्यपदकं पटकावली आहेत. यापैकी ८ हॉकी संघानेच पटकावली आहेत. बॉक्सिंग आणि कुस्तीत एकेक पदक पाकिस्तानच्या नावावर आहे. तब्बल ३२ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत अर्शद नदीमने विक्रमी कामगिरीसह ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.