आशियाई देशांमध्ये विभिन्न संस्कृती असल्यामुळेच लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत, असे सांगत आशियाई ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष शेख अहमद अल फहाद अल सबाह यांनी लोकांची क्षमा मागितली.
सबाह म्हणाले की, ‘‘स्पर्धेच्या एका महिला स्वयंसेविकेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाबद्दल इराणच्या पथकातील वरिष्ठ अधिकारी व पॅलेस्टाईन फुटबॉलपटूवर कडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक देशात विभिन्न संस्कृतीचे व जाती-धर्माचे लोक राहत आहेत. त्यामुळे काही वेळा खूप समस्या निर्माण होतात.’’
या स्पर्धेत ४५ देशांचे १३ हजारांहून अधिक खेळाडू व पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला आहे.