इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर आगामी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित होते. परंतु संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने या अपयशी खेळाडूंना अभय देत कोलकात्यामध्ये ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात कोणतेही बदल केलेले नाहीत. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज उमेश यादवऐवजी बंगालच्या अशोक दिंडाला संधी देण्यात आली आहे.
मुंबईतील पराभवानंतर अपयशी सचिन तेंडुलकरच्या कामगिरीवर जोरदार टीका झाली. परंतु निवड समितीने सचिनवरील विश्वास प्रकट केला आहे.
संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, इशांत शर्मा, मुरली विजय आणि झहीर खान.