ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या १० नोव्हेंबरला होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १९ पदांकरिता ३३ उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान अध्यक्ष देवराम भोईर (नगरसेवक) यांना धर्मवीर कबड्डी विकास पॅनेलच्या कृष्णा पाटील (नगरसेवक) यांचे आव्हान उभे ठाकले आहे. धर्मवीर गटात विद्यमान कार्याध्यक्ष मनोज पाटील आणि सहचिटणीस मालोजी भोसले हे माजी कार्यकारिणी सदस्य सामील झाल्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
सहकोषाध्यक्ष पदावर मंदार तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर विद्यमान सरचिटणीस शशिकांत ठाकूर यांना कोषाध्यक्षपदासाठी रतन पाटील यांचे आव्हान असेल. सरचिटणीस पदासाठी अजय म्हात्रे आणि मालोजी भोसले यांच्यात सामना होईल. मनोज पाटील यांना कार्याध्यक्षपदासाठी भूषण पाटील यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
निवडणुकीचे अंतिम चित्र (१९ पदांसाठी ३३ उमेदवार)
देवराम भोईर धर्मवीर कबड्डी
पॅनेल विकास पॅनेल
अध्यक्ष (१)
देवराम भोईर कृष्णा पाटील
कार्याध्यक्ष (१)
भूषण पाटील मनोज पाटील
सरचिटणीस (१)
अजय म्हात्रे मालोजी भोसले
सहसचिव (४)
अरुण म्हात्रे सुरेश तरे
पुंडलिक गोरले राजेंद्र मुणनकर
प्रेमनाथ पाटील भगीरथ पाटील
जीतेंद्र तरे विशाल गलुगडे
कोषाध्यक्ष (१)
शशिकांत ठाकूर रतन पाटील
सहकोषाध्यक्ष (१-बिनविरोध)
मंदार तावडे
कार्यकारिणी सदस्य (१०)
प्रवीण गोंधळे विकास पवार
कृष्णा भुजबळ सत्यवान जाधव
काळीराम म्हात्रे देवानंद पाटील
मच्छिंद्र म्हात्रे शिवदास पाटील
अमोल तरे रोशन म्हात्रे
मुकेश पाटील प्रवीण दळवी
दीपक म्हात्रे
पंकज चव्हाण
संदीप शिकारे
लिना कांबळे
