सध्या देशभरात गाजत असलेल्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी मतप्रदर्शन करण्यास पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नकार दिला.
मात्र या प्रकरणी तपास सुरू असून राजकारण आणि खेळ या दोन्ही गोष्टींची सरमिसळ करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्पॉट-फिक्सिंगबाबत मत व्यक्त करण्याची आपली इच्छा नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे या क्षणी कोणतीही प्रतिक्रिया देणे उचित नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
जपान आणि थायलंडच्या दौऱ्यावरून परत येत असताना पंतप्रधानांनी त्यांच्या विशेष विमानात पत्रकारांशी संवाद साधला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2013 रोजी प्रकाशित
राजकारण आणि खेळ यांची सरमिसळ करू नये
सध्या देशभरात गाजत असलेल्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी मतप्रदर्शन करण्यास पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नकार दिला.
First published on: 01-06-2013 at 03:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not mix politics and sports manmohan singh