Viral Video, Dog Enters In Ground: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजयाची नोंद केली. आता मालिकेतील दुसरा सामना ग्रेनेडाच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, एखादा सामना पावसामुळे किंवा वादळ आल्यामुळे थांबतो. पण, वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेला सामना या कारणांमुळे नव्हे, तर मैदानात कुत्रा आल्यामुळे थांबवण्यात आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ६६.५ षटकात २८६ धावांवर आटोपला. त्यानंतर वेस्टइंडिजचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. दरम्यान दुसऱ्या डावात वेस्टइंडिजची फलंदाजी सुरू असताना अचानक काळ्या रंगाचा कुत्रा मैदानात घुसला. खेळाडूंनी त्याला पळवण्याचा प्रयत्न केला. पण, तो काही मैदानाबाहेर जात नव्हता. कुत्र्यामुळे काही मिनिटं सामना थांबला. त्यानंतर शेवटी ड्रोनचा वापर करून कुत्र्याला मैदानाबाहेर काढण्यात आलं. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २८६ धावांवर आटोपला
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात आला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरीने ६३ धावांची खेळी केली. तर ब्यू वेबस्टरने ६० धावा केल्या . सॅम कॉन्टास २५, उस्मान ख्वाजा १६, कॅमरून ग्रीन २६, स्टीव्ह स्मिथ ३ आणि ट्रॅव्हिस हेड २९ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २८६ धावांवर आटोपला.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडिजला २५३ धावांपर्यंत मजल मारता आली. वेस्टइंडिजकडून ब्रेंडन किंगने ७५ धावांची खेळी केली. जॉन कॅम्पबेलने ४० धावांची खेळी केली कर्णधार रोस्टन चेजने १६ धावांची खेळी केली. शाई होपने २१ धावांची खेळी केली. तर शेवटी अल्जारी जोसेफने २७ आणि शमार जोसेफने २९ धावांची खेळी केली. मात्र वेस्टइंडिजला २५३ धावा करता आल्या.