scorecardresearch

Premium

Asia Cup 2023: “कोहलीविरुद्ध स्लेजिंग करू नका, तो कंटाळा…”, ‘या’ दक्षिण आफ्रिकी खेळाडूचा गोलंदाजांना सल्ला

Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गज वेगवान गोलंदाजानेही विराटबाबत विरोधी संघातील गोलंदाजांना सावध केले आहे. विराट कोहलीला स्लेजिंग न करणे हा त्याला बाद करण्याचा चांगला मार्ग आहे, असा सल्ला दिला.

Don't sledge against Kohli he will get bored and get out advises Makhaya Ntini to bowlers
दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गज वेगवान गोलंदाजानेही विराटबाबत विरोधी संघातील गोलंदाजांना सावध केले आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Makhaya Ntini on Virat Kohli: विराट कोहलीची आक्रमक शैली सर्वांनाच माहिती आहे. मैदानावर असे अनेक सामने झाले आहेत ज्यात गोलंदाज काही बोलला की कोहलीने त्याला बॅटने जोरदार उत्तर दिले आहे. कोहलीच्या या शैलीबाबत दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी खेळाडू मखाया अ‍ॅनटिनीने गोलंदाजांना आवश्यक सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, “सामन्यादरम्यान कोहलीला काहीही बोलू नका, त्याला बाद करण्याचा हाच एक मार्ग आहे.”

रेव स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज अ‍ॅनटिनी म्हणाला, “मी तुम्हाला विराट कोहलीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. मी हे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला सांगू इच्छितो जो त्याच्याकडे गोलंदाजी करेल. जेव्हा तो (कोहली) फलंदाजी करतो तेव्हा त्याला एक शब्दही बोलू नका. मी हे पुन्हा सांगतो की, त्यांना काहीही बोलून, स्लेज करू नका. जर तुम्ही असे केले तर तो त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही त्याला ओळखत असाल तरच त्याला स्लेजिंग आवडते. नाहीतर तो त्या गोलंदाजामागे हात धुवून लागतो. कोणीतरी त्याला स्लेजिंग करावे हाच प्रकार त्याला आवडतो.”

Mohammad Amir Praises Virat Video Viral
VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर
mumbai vs assam ranji trophy match shardul's 6 wickets
शार्दुल ठाकूरचे शानदार पुनरागमन! अवघ्या २१ धावात ६ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाचा डाव लंच ब्रेकपूर्वीच गुंडाळला
Indian team restricted England to 253 runs in the first innings
IND vs ENG : बुमराहसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, भारताने पहिल्या डावाच्या जोरावर घेतली १४३ धावांची आघाडी
India Vs England 2nd Test pitch , Sourav Ganguly Questions
IND vs ENG : “मला अजूनही आश्चर्य वाटते की…”, दुसऱ्या कसोटीतील खेळपट्टी पाहून सौरव गांगुलीने उपस्थित केला प्रश्न

हेही वाचा: Asia Cup 2023: श्रीलंकेने आशिया कप २०२३साठी सदस्यीय संघ केला जाहीर, कोणाची हाती आहे टीमची कमान? जाणून घ्या

अ‍ॅनटिनी पुढे म्हणाला की “जर सतत तुम्ही असे स्लेजिंग करत राहिल्यास तो त्याचे इसिप्त साध्य करेल. तुम्ही त्याला जे हवे आहे ते देत आहात. त्यामुळे माझा सल्ला असा आहे की, त्याच्या विरोधात गप्प बसा. कोहलीविरुद्ध स्लेजिंग करू नका, तो कंटाळा येऊन आपोआप बाद होईल.”

कोहलीला स्लेजिंग न करणे, त्याला बाद करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे- मखाया अ‍ॅनटिनी

कोहलीच्या आक्रमकतेबद्दल बोलताना अ‍ॅनटिनी म्हणाला की, “विराट विरुद्ध स्लेजिंग केलं नाही तर तो आपोआप कंटाळा येऊन बाद होऊ शकतो.” तो पुढे म्हणाला की, “जेव्हा तो पाहतो की गोलंदाज काहीही बोलत नाही, तेव्हा त्याला कंटाळा येईल. त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी त्याला मध्यभागी काहीतरी चार्जअप होण्यासाठी गरजेचे असते. जेव्हा त्याला काही मिळत नाही, तेव्हा त्याला कंटाळा येईल आणि तेव्हाच ते चुका करेल. त्याच्यासमोर खेळाडूंनी हुशार असणे गरजेचे आहे. तुम्ही इतर फलंदाजांसोबत जसं करता तसं त्याच्यासमोर करू नका.”

हेही वाचा: Suryakumar Yadav: “मी रोहित, कोहली, द्रविड यांच्याशी बोललो…” ‘वन डेत यशस्वी का नाही’ या प्रश्नावर सूर्यकुमारचे सडतोड उत्तर

अ‍ॅनटिनीने वर्ल्डकप २०२३चे सर्वोतम चार संघ निवडले

अ‍ॅनटिनीने उपांत्य फेरीत जाण्यासाठी आपले चार आवडते संघ निवडले आहेत. तो म्हणाला, “माझे सर्वोतम चार सेमीफायनल जाणारे संघ दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी विश्वचषक जिंकण्याची ही उत्तम संधी आहे.” तो पुढे म्हणाला, “मला वाटते की या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडे ट्रॉफी घरी आणण्याची चांगली संधी आहे. दक्षिण आफ्रिकेचे अनेक खेळाडू आयपीएल खेळतात आणि भारतीय परिस्थितीत दोन महिन्यांहून अधिक काळ घालवतात. या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनोळखी नाहीत. खेळपट्टीकडून काय अपेक्षा करावी आणि आव्हानांचा सामना कसा करावा, हे त्यांना माहीत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या संघात खूप प्रतिभा आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dont sledge against kohli he will get bored and get out advises makhaya ntini to bowlers avw

First published on: 29-08-2023 at 19:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×