Champions League Football लॅपझिग : जोस्को ग्वार्डिओलने उत्तरार्धात केलेल्या गोलच्या बळावर चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याच्या सामन्यात आरबी लॅपझिग संघाने मँचेस्टर सिटीला १-१ असे बरोबरीत रोखले.
मँचेस्टर सिटीने सामन्याची सुरुवात आक्रमक केली. पहिल्या सत्रात सिटीचे वर्चस्व राहिले. २७व्या मिनिटाला जॅक ग्रिलिशच्या साहाय्याने रियाद महारेझने गोल करत सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लॅपझिगकडून बरोबरी साधण्याचे प्रयत्न झाले. मात्र, सिटीने भक्कम बचाव करताना मध्यंतरापर्यंत आघाडी कायम ठेवली.
उत्तरार्धात सिटीचे आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र, त्याच वेळी लॅपझिगने प्रतिहल्ला करताना गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. ग्वार्डिओलने ७०व्या मिनिटाला गोल करत लॅपझिगला बरोबरी साधून दिली. या गोलनंतर सिटीकडून पुन्हा आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
परंतु अखेरीस त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले.