भारताची अव्वल महिला धावपटू द्युती चंदने इंडियन ग्रँड प्रिक्स येथे ४३.३७ या नवीन राष्ट्रीय विक्रमासह महिलांच्या ४x१०० मीटर रिले स्पर्धेत भारत ‘अ’ संघासाठी सुवर्णपदक जिंकले. या संघात अर्चना ए, धनलक्ष्मी, हिमा दास हे खेळाडू होते. २०१६मध्ये हा विक्रम ४३.४२ सेकंदाचा होता. भारताच्या ‘ब’ संघाने ४८.०२ या वेळेसह दुसरा, तर मालदीवने ५०.७४ सेकंदाची वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला.

दरम्यान, १०० मीटरमध्ये द्युतीने ११.१७ सेकंदाची वेळ नोंदवत आपला पूर्वीचा ११.४२ सेंकदाच्या विक्रमात सुधारणा केली. मात्र तिला टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता असलेली ११.१५ सेकंदाची वेळ नोंदण्यात अपयश आले. दानेश्वरी एटीने दुसरे, तर हिमाश्री रॉयने तिसरे स्थान पटकावले.

 

भारताच्या डिस्कस थ्रोअमध्ये कमलप्रीत कौरने ६६.५९ मीटर गुणांचा कमाई केली, परंतु तिच्या प्रयत्नांना राष्ट्रीय विक्रम मानले जाणार नाही कारण ती मैदानावरील एकमेव खेळाडू होती. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियानुसार (एएफआय) किमान तीन खेळाडू राष्ट्रीय विक्रमासाठी रिंगणात असणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला भाला भेक स्पर्धेत अनु राणीने ६०.५८ मीटरच्या कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले, तर संजना चौधरीने ५३.५४ मीटरच्या कामगिरीसह रौप्यपदक जिंकले. शिल्पा राणीने कांस्यपदक जिंकले.