ENG vs IND : विराटमुळं वातावरण तापलं, LIVE कॉमेंट्री दरम्यान गावसकर-हुसेन यांच्यात झाला वाद

गावसकरांनी केली हुसेनची बोलती बंद

ENG vs IND sunil gavaskar and nasser hussain in heated debate
सुनील गावसकर आणि नासिर हुसेन

दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनला समालोचन करताना फटकारले आहे. सध्याच्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघापेक्षा भारताच्या मागील क्रिकेट संघांना मैदानात धमकावणे (बुली करणे) सोपे होते, असे विधान हुसेनने केले होते. कसोटी सामन्यांमध्ये प्रथम दहा हजार धावा करणार्‍या गावसकरांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाच वेळा (१९७१, १९७४ १९७९, १९८२, १९८६) इंग्लंडचा दौरा केला.

आमच्या पिढीतील क्रिकेटपटूंना धमकावले जाऊ शकते, असे सांगितले गेले तर मी खूप रागावेन, असे गावसकरांनी हुसेनला सांगितले. या दोघांचा एका लेखावरून LIVE कॉमेंट्रीदरम्यान वाद झाला. इंग्लंडच्या माजी कर्णधाराने हा लेख एका ब्रिटिश वृत्तपत्रासाठी लिहिला आहे. त्यात हुसेनने लिहिले आहे, की पूर्वीचे भारतीय संघ या वर्तमान संघाच्या तुलनेत एका मजबूत नव्हते.

माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी ऑन-एअर हुसेनला विचारले, ”तुम्ही म्हणालात की या भारतीय संघाला धमकावले जाऊ शकत नाही, तर मागील पिढीच्या संघांना धमकावले जाऊ शकत होते. तुम्ही कोणत्या पिढीबाबत बोलत आहा ते सांगा? आणि बुली म्हणजे नक्की काय?”

हेही वाचा – IPL 2021 : पंड्या बंधूंचा विषयच खोल..! अलिशान गाडीनं हॉटेलमध्ये पोहोचले; पाहा VIDEO

हुसेनने त्याच्या लेखात काय लिहिले आहे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, ”मला फक्त असे वाटते की पूर्वीचे भारतीय संघ आक्रमकतेला नाही, नाही, नाही म्हणत होते, पण कोहलीने जे केले ते दुहेरी आक्रमकता दर्शवत आहे. मी त्याची एक झलक सौरव गांगुलीच्या संघात पाहिली आणि त्याने सुरुवात केली. विराट संघात नसतानाही अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियन संघावर वर्चस्व गाजवले.”

गावसकर यांनी हुसेन यांचे दावे काही आकडेवारीने खोडून काढले. ते म्हणाले, “परंतु जेव्हा तुम्ही म्हणता की मागील पिढीतील संघांना धमकावले जाऊ शकते, तेव्हा मला असे वाटत नाही. माझ्या पिढीला बुली म्हटले, तर मला खूप राग येईल. जर तुम्ही रेकॉर्ड बघितले तर १९७१ मध्ये आम्ही जिंकलो, हा माझा पहिला इंग्लंड दौरा होता. १९७४ मध्ये आम्हाला अंतर्गत समस्या होत्या त्यामुळे आम्ही ०-३ने हरलो. १९७९मध्ये आम्ही ०-१ने हरलो, ओव्हलवर ४२९ धावांचा पाठलाग केला असता तर मालिका १-१ होऊ शकली असती.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eng vs ind sunil gavaskar and nasser hussain in heated debate adn