…अन् सारा संघ विजयाचा जल्लोष करताना सामना जिंकवून देणारे मात्र खुर्च्यांवरुन हललेही नाहीत; फोटो होतोय व्हायरल

अखेरच्या चार षटकांमध्ये १२ हून अधिकच्या सरासरीने ५७ धावांची गरज असताना न्यूझीलंडच्या संघाने ६ चेंडू शिल्लक ठेऊन सामना जिंकला

Eng vs Nz Jimmy Neesham and kane williamson did not move from chairs
न्यूझीलंड पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामना. जिंकणारा संघ अंतिम सामन्यात जाणार तर पराभूत झालेला थेट घरी. अगदी रोमहर्षक पद्धतीने सामन्यातील पारडं कधी एका संघाकडे तर दुसऱ्या संघाकडे झुकत झुकत अगदी शेवटून दुसऱ्या षटकापर्यंत सुरु असणारा खेळ. एका क्षणी धावांचा पाठलाग करताना २४ चेंडूंमध्ये ५७ धावांची गरज असताना अवघ्या १८ चेंडूंमध्येच ५७ धावा करत थेट संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली तर संघातील खेळाडूंची पहिली प्रतिक्रिया सहाजिकपणे जल्लोषाने मैदानात धाव घेणे, फलंदाजी करणाऱ्याला आलिंगन देणे अशी असेल. पण बुधवारी इंग्लंडवर अगदी रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडच्या डगआऊटमधील दोघे अगदी शांतपणे बसून होते.

नक्की वाचा >> T20 World Cup Semifinal: ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन करतोय पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना; म्हणाला, “इंशाअल्लाह…”

विशेष म्हणजे या ऐतिहासिक विजयामध्ये दोघांचेही योगदान फार मह्तवाचे होते. सध्या या दोघांचा हाच फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरतोय. या दोन खेळाडूंची नाव आहेत, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि ११ चेंडूंमध्ये २७ धावांची खेळी करत संघाला अंतिम सामन्यात नेणारा जिमी नीशाम…

नक्की वाचा >> २०१७ मध्येच क्रिकेट सोडण्याच्या विचारात असणारा खेळाडूच आज न्यूझीलंडला T20 World Cup फायनलमध्ये घेऊन गेला

अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १९ षटकांत गाठत न्यूझीलंडने पाच गडी राखून सामना जिंकला. मात्र या सामन्यात एक वेळ अशी होती की न्यूझीलंडला प्रत्येक षटकाला १२ हून अधिक धावा करण्याची गरज होती. या संकटाच्या प्रसंगी संघासाठी जिमी नीशाम हा देवासारखा धावून आला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. क्रिस जॉर्डनने टाकलेल्या सामन्यातील १७ व्या षटकामध्ये जिमी नीशामने तब्बल २३ धावा करत सामन्याचं पारडं न्यूझीलंडच्या बाजूने झुकवलं. त्यावर ४७ चेंडूंत नाबाद ७२ धावा करणाऱ्या डॅरेल मिचेलने विजयाचा कळस चढवला.

नक्की वाचा >> “बाबरबद्दल मी असं म्हणालोच नव्हतो, मी फक्त…”, पाकिस्तानी चाहत्यांनी व्हायरल केलेल्या Fake Tweet वर हर्षा भोगलेंचा भन्नाट रिप्लाय

विजयी चौकार लगावताच न्यूझीलंड संघाने एकच जल्लोष केला. मात्र या जल्लोषातही सामाना जिंकून देणारा नीशाम आणि संघाचं नेतृत्व करणारा विल्यमसन अगदी शांतपणे बसून होते. त्यांचे हे फोटो व्हायरल झालेत. सामन्यातील विजयी चौकार लगावल्यानंतर न्यूझीलंडचे सर्व खेळाडू हात वरुन करुन उत्साहाने आरडाओरड करत उठले आणि मैदानात धावू लागले असं असताना नीशाम आणि विल्यमसन मात्र त्यांच्या खुर्चांवर बसून होते. सध्या हे फोटो चर्चेत असून विजयानंतरही उन्माद न करता तो शांतपणे स्वीकारणाऱ्या या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

विचारसणीचा फरक

संपूर्ण संघ आणि ते दोघे

ना प्रतिक्रिया ना सेलिब्रेशन

तो जागेवरुन हलला पण नाही…

कूलनेस…

काय विचार करत असतील हे दोघे

त्याला बघा

खेळ आणि खेळानंतरचा कूलनेसही भारी…

वेगळीच तुलना

तो नंतरही तिथेच बसून होता

अखेरच्या चार षटकांत ५७ धावांची गरज असताना नीशामने ख्रिस जॉर्डनच्या एकाच षटकात २३ धावा (२ वाइड आणि २ लेग बाय) फटकावल्या. तसेच न्यूझीलंडने पुढील दोन षटकांत ३४ धावा करत हा सामना जिंकला. डॅरेल मिचेलने सुरेख फटकेबाजी करत संघाला सामना जिंकून दिला. मिचेलच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eng vs nz jimmy neesham and kane williamson did not move from chairs after team reach t 20 world cup final scsg

ताज्या बातम्या