ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी निवड करण्यात आलेल्या १७ खेळाडूंची घोषणा केली आहे. टी २० वर्ल्डकपनंतर आता अ‍ॅशेस मालिकेतही बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि सॅम करनला बाहेर असणार आहेत. १७ खेळाडूंमध्ये १० खेळाडू पहिल्यांदाच अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहेत. यात उपकर्णधार जोस बटलरचाही समावेश आहे. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा हा चौथा अ‍ॅशेस दौरा आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झालेला ब्रॉड पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

दुसरीकडे बोटाची जखम आणि मानसिक आरोग्यासाठी बेन स्टोक्सने थोडे दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. “इंग्लंडसाठी ऑस्ट्रेलिया दौरा नेहमीच महत्त्वाचा असतो. मला आनंद आहे की, सर्व निवड झालेले खेळाडू यासाठी प्रतिबद्ध असतील. आम्ही ऐतिहासिक मालिकेच्या दौरा आणि अनुभवाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहोत.”, असं इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक सिल्वरवूड यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघ
जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्राउले, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, जॅक लीच, डेविड मलान, क्रेग ओवरटन, ओली पॉप, ओली रॉबिनसन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड