इंग्लंडपुढे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी स्वतंत्र कर्णधार नेमण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे मत व्यक्त करून माजी कर्णधार माइक आर्थर्टन यांनी संघाची निर्णय प्रक्रिया आणि निवड समितीवर टीका केली आहे.
‘‘इंग्लंडची निर्णय प्रक्रिया ही ऐतिहासिक पद्धतीवर आधारित आहे. निवड प्रक्रियासुद्धा कसोटी क्रिकेटला समोर ठेवून केली जाते. कर्णधारपदाकडेसुद्धा त्याच पद्धतीने पाहिले जाते. तीन वर्षांपूर्वी जेव्हा अॅलिस्टर कुककडे कर्णधारपद सोपविण्यात आले, त्याच वेळी मी माझे मत परखडपणे मांडले होते,’’ असे आर्थर्टनने ‘द टाइम्स’मधील आपल्या स्तंभात म्हटले आहे.
या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालखंडात इंग्लंडचा संघ १७ कसोटी सामने खेळणार आहे. याबाबत आर्थर्टन म्हणाला, ‘‘एखादी व्यक्ती सारख्याच प्रमाणातील ऊर्जा क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांना देणे कठीण आहे. कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी स्वतंत्र कर्णधार नेमणे, हाच यावर उपाय आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2014 रोजी प्रकाशित
इंग्लंडपुढे स्वतंत्र कर्णधार नेमण्याचा पर्याय -आथर्टन
इंग्लंडपुढे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी स्वतंत्र कर्णधार नेमण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे मत व्यक्त करून माजी कर्णधार माइक आर्थर्टन यांनी संघाची निर्णय प्रक्रिया आणि निवड समितीवर टीका केली आहे.
First published on: 05-09-2014 at 01:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England need to use split captaincy says michael atherton